Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात उष्णतेची लाट कायम

विदर्भात तापमान 42 अंशाच्यापार

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानवाढीचा नवा उच्चांक दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात तापमान उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांना उष्माघात होत

महाराष्ट्रात स्वराज्याची सत्ता आणायची असेल तर स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्याने रात्रंदिवस मेहनत घेऊन स्वराज्यासाठी काम केले पाहिजे
बेलापुरात चार गावठी कट्ट्यांसह दोघे जेरबंद
पतंजली ला झटका!

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानवाढीचा नवा उच्चांक दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात तापमान उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांना उष्माघात होतांना दिसून येत आहे. मराठवाड्यात उष्माघाताचा पहिल्या बळीची नोंद नोंदवण्यात आली असतांना, पुन्हा एकदा राज्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बुधवारी पुन्हा एकदा तापमान वाढत असून विदर्भात पारा 42 अंश सेल्सिअस पलीकडे गेला आहे.
हवामान खात्याने आठवड्याच्या अखेरीस पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरीही येत्या दोन-तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिला आहे. विदर्भात तापमानाच्या पार्‍यात वेगाने वाढ होत आहे. कमाल तापमानसह किमान तापमान देखील वाढत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत तापमानाच्या पार्‍यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मंगळवारी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे 42.3 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. तर वर्धा, यवतमाळ, वाशीम आणि अकोला शहरात तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक होता. भारतीय हवामान खात्याने एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची इशारा दिला आहे. सरासरी पेक्षा तापमान अधिक राहण्याची शक्यता असल्याने यावर्षी विदर्भात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसहुन अधिक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, तापमानवाढीचा आलेख वर जात असताना येत्या शुक्रवारपासून चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण आणि मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. यावेळी तापमानात मात्र फारशी घट होणार नाही.

COMMENTS