औराद शहाजानी प्रतिनिधी - निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, याचा फटका नागरिकांना बसत आहे. तगरखेडा येथी
औराद शहाजानी प्रतिनिधी – निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, याचा फटका नागरिकांना बसत आहे. तगरखेडा येथील शेतकर्याचा दिवसभर उन्हामध्ये काम केल्याने उष्मघातामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.
सोमवारी सायंकाळी शेतकरी पांडुरंग रामराव मुळजे (वय 65, रा. तगरखेडा ता. निलंगा) हे शेतात अवकाळी पावसाने ज्वारीचे नुकसान झाले होते. पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने जागेवर असलेला पशुधनांचा चारा गोळा करावा म्हणून ते दुपारपर्यंत शेतात कडबा गोळा केला. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एका पाहुण्याच्या अंत्यसंस्काराला जाऊन ते तगरखेडा येथील घरी आले. अंघोळ करून बाहेर येतानाच त्यांना अचानक चक्कर आली, त्यानंतर उल्टी झाली. शिवाय, डोक्याला तापही चढला. यावेळी त्यांना उपचारासाठी दाखल केले असता, उष्मघाताने मृत्यू झाल्याचे डॉ. डी. एम. कदम यांनी सांगितले. औराद शहाजानी परिसरात दिवसेंदिवस तापमान वाढत असून, गत आठवड्यात पारा 43 अंशांवर गेला होता. काही दिवस ढगाळ वातावरणाने तापमानात उच्चांकी तर कधी वादळ-वारा आणि पावसामुळे तापमानात चढउतार होत आहे. गत दोन दिवसांपासून पुन्हा तापमानाचा पारा वाढला आहे. सोमवारी औराद शहाजानी हवामान केंद्रावर 41 अंश तापमानाची नोंद झाली आहे. सध्याला दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. परिणामी, अंगाची लाहीलाही होत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, शक्यतो भरदुपारी उन्हात घराबाहेर पडू नये, पांढरा कपडा डोक्यावर वापरावा, शेतकर्यांनी शेतातील कामे सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात करावीत.
COMMENTS