यंदा उष्णतेने मोडला 122 वर्षांचा ’रेकॉर्ड’

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदा उष्णतेने मोडला 122 वर्षांचा ’रेकॉर्ड’

एप्रिल महिन्यात मध्य आणि उत्तर पश्‍चिम भागात नोंदवले सर्वाधिक तापमान

नवी दिल्ली : देशात यंदा उष्णतेने विक्रम मोडीत काढले असून, मार्च महिना शतकातील सर्वात उष्ण महिना म्हणून नोंद करण्यात आल्यानंतर आता एप्रिल महिना देखील

मनीष सिसोदियांना 17 महिन्यानंतर जामीन
इलेक्ट्रिक बाइक चार्ज करताना शोरूमला आग
या आमदाराच्या पत्नीने केली आत्महत्या l LOK News 24

नवी दिल्ली : देशात यंदा उष्णतेने विक्रम मोडीत काढले असून, मार्च महिना शतकातील सर्वात उष्ण महिना म्हणून नोंद करण्यात आल्यानंतर आता एप्रिल महिना देखील 122 वर्षांतील सर्वाधिक उष्ण महिना असल्याची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीत शनिवारी दुपारी 12 वाजता पारा 41 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. यासोबतच देशातील काही भाग असे आहेत जिथे कमाल तापमान 47 अंशांच्या जवळ पोहोचले आहे. दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील लोक उष्णतेच्या लाटेशी झुंज देत आहेत.
दरम्यान, हवामान खात्याचे संचालक डॉ एम महापात्रा यांनी देशातील हवामानाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, एप्रिलमध्ये भारतातील उष्णतेने 122 वर्षांचा विक्रम मोडला आहे. गेल्या 122 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात यंदा देशाच्या मध्य आणि उत्तर पश्‍चिम भागात सर्वाधिक अधिक तापमान नोंदवण्यात आले. उत्तर-पश्‍चिम भागात 35.90 अंश सेल्सियस, तर मध्य भागात 37.78 अंश सेल्सियस तापमानाची नोद घेण्यात आली. हवामान खात्यानुसार यंदा देशातील बहुतांश भागत सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्‍चिम आणि पूर्वोत्तरच्या काही भागांना वगळता देशातील बहुतांश भागातील पाऊस सामान्य तसेच त्याहून अधिक राहण्याची शक्यता डॉ. मोहपात्रा यांनी वर्तवली आहे. यापूर्वी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मार्च महिना इतिहासातील सर्वात उष्ण महिना ठरला. दिल्ली, चंद्रपार, जम्मू, धर्मशाला, पटियाला, डेहराडून, ग्वाल्हेर, कोटा, पुणे या भागांत उच्च तापमानाची नोंद झाली. पश्‍चिम हिमालयात असलेल्या ‘हिल स्टेशन’मधील तापमान सामान्यपेक्षा 7 ते 11 अंशानी जास्त नोंदवण्यात आले. डेहराडून, धर्मशाला आणि जम्मूमध्ये तापमान 34 ते 35 अंश नोंदवण्यात आले. विशेष म्हणजे मार्च 2022 मध्ये कमाल, किमान आणि सरासरी तापमान अनुक्रमे 33.1 अंश सेल्सियस, 20.24 अंश सेल्सियस आणि 26.67 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. या तापमानाची 1981-2010 या वर्षाशी तुलना केली तर अधिक नोंदवण्यात आली आहे. या वर्षात हे तापमान 31.24 अंश सेल्सियस, 18.87 अंश सेल्सियस आणि 25.06 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते.

दिल्लीत 72 वर्षानंतर सर्वाधिक उष्णता
मार्च आणि एप्रिलमध्ये देशाच्या मध्यवर्ती भागात तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त होते. दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब, चंदीगड, हिमाचल प्रदेशमध्ये तापमान सामान्यपेक्षा 4 अंश सेल्सिअस जास्त होते. दिल्लीत 72 वर्षांनंतर दुसर्‍यांदा एवढी उष्णता जाणवत आहे. यापूर्वी 2010 मध्ये सरासरी कमाल तापमान 40.4 अंश होते. तर यावर्षी ते 40.2 अंश सेल्सिअस होते. एक दिवसापूर्वी तापमान किती होते, येत्या आठवडाभरात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मे महिन्यात तापमान 50 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता : डॉ. महापात्रा
महाराष्ट्रात उत्तरेकडील राज्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाडयाचा मोठा त्रास सहन करावा लागत असतांना, हवामान विभागाने मे महिन्यात उत्तर भारतातील तापमान 50 अंशांच्या पुढे जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आधीच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आत अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. आयएमडीचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा यांनी उन्हाचा सध्याचा ट्रेंड पाहता वरील अंदाज वर्तवला आहे.

COMMENTS