Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निकृष्ट गणवेशप्रकरणी कंत्राटदाराची कानउघडणी

गटविकास अधिकार्‍याने खरडपट्टी काढत उत्कृष्ट दर्जाचे गणवेश देण्याचे निर्देश

देवळाली प्रवरा ः जिल्हा परिषदेच्या शाळांना निकृष्ट शिलाईचे गणवेश पुरविल्याची तक्रारी आल्या आहेत.त्याची दखल राहुरीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे या

नगरसह दहा जिल्हे उद्यापासून निर्बंधमुक्त ; सर्व व्यवहार खुले
नगर जिल्हा अध्यात्माची भूमी – पालकमंत्री विखे
*देशातील पहिलं मोफत ऑटिजम सेंटर व सेन्सरी पार्क लातूरमध्ये l LokNews24*

देवळाली प्रवरा ः जिल्हा परिषदेच्या शाळांना निकृष्ट शिलाईचे गणवेश पुरविल्याची तक्रारी आल्या आहेत.त्याची दखल राहुरीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी घेतली असुन शिलाईचे कंत्राट घेतलेल्या महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) प्रतिनिधींना बोलावून कानउघडणी करुन फाटके,तुटके, उसवलेले, खराब शिवलेले गणवेश माघारी घेवून त्यातील त्रुटी दूरकराव्यात, व्यवस्थित शिवलेले गणवेश द्यावेत.केंद्र प्रमुखांनी शाळेतील शिक्षकांना व शाळा व्यवस्थापन समितीस कायद्याचा धाक दाखवून गणवेश स्वीकारण्यास भाग पाडल्याची तक्रारी आल्यास केंद्र प्रमुखांची चौकशी करुन कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
         ’गणवेशाचे कापड व शिलाईचा दर्जा निकृष्ट असल्याच्या वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वळण येथिल जिल्हा परिषद शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद फुणगे यांनी गणवेश स्वीकारण्यास नकार दिला.तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी एकञित येवून तहसिलदार व गट विकास अधिकारी यांना गणवेशाबाबत तक्रारी केल्या.त्यांच्या तक्रारीची दखल घेत  गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी तातडीने बैठक बोलवली. या बैठकीसाठी गट शिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे, विस्तार अधिकारी अर्जुन गारूडकर, सुमन सातपुते, विषय तज्ज्ञ सतीश तांदळे, माविमचे प्रतिनिधी मच्छिंद्र कुर्‍हे  व महेश आबूज आदींना बोलविण्यात आले होते. या बैठकीत माविमचे प्रतिनिधी मच्छिंद्र कुर्‍हे  व महेश आबूज यांची चांगलीच कानउघडणी केली. एक राज्य एक गणवेश योजने अंतर्गत शासनाच्या मोफत गणवेश माविमतर्फे महिला बचत गटांना पहिल्या गणवेशाच्या शिलाईचे काम देण्यात आले. राहुरी तालुक्यातीव ग्रामिण व शहरी भागातील 2500 ते 3000 महिला बचत गट असतानाही माविमच्या प्रतिनिधींनी अवघ्या पाच ते सहा बचत गटांच्या नावावर शिलाईचे काम दाखविले. प्रत्यक्षात माञ बाहेरून  शिलाईची कामे करुन घेतली आहे.बाहेरच्या व्यक्तीने शिलाईचे काम करताना निकृष्ट  दर्जाचे काम केले.तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्या तक्रारीची दखल घेवून माविमचे प्रतिनिधी मच्छिंद्र कुर्‍हे व महेश आबूज यांची कानउघडणी करुन  फाटके,तुटके, उसवलेले, खराब शिवलेले गणवेश माघारी घेवून दुरुस्त करुन द्यावे.असे गटविकास अधिकारी शिंदे यांनी फर्मान सोडले आहे. केंद्र प्रमुखांनी काही ठिकाणी कायद्याचा धाक दाखवून शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीस गणवेश स्वीकारण्यास भाग पाडले असल्यास त्या संदर्भात कोणाचीही तक्रार आल्यास केंद्र प्रमुखांची चौकशी करुन कारवाई करण्याचे संकेत शिंदे यांनी दिले आहे.

शिलाईच्या त्रुटी दूर करा ! – फाटके, तुटके, उसवलेले, खराब शिवलेले, आडमाप, चुकीचे शिवलेले, तिरपे खिसे, बटने तुटलेली, पॅन्टची चैन खराब कपडे त्रुटी असलेले गणवेश शाळानिहाय केंद्राच्या ठिकाणी परत जमा करावेत. ते गणवेश माविमच्या प्रतिनिधींनी केंद्राच्या ठिकाणी जाऊन घ्यावेत. पुन्हा व्यवस्थित शिवून केंद्राच्या ठिकाणी पोहच करावेत असे आदेश गटविकास अधिकारी शिंदे यांनी दिले.

COMMENTS