मुंबई : राज्यात तब्बल साडेचार-पाच वर्षांपूर्वी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांनी माझ्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण

मुंबई : राज्यात तब्बल साडेचार-पाच वर्षांपूर्वी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांनी माझ्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला असून, याप्रकरणात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात त्यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयात 2 एप्रिल रोजी सुनावणी होणार असून, त्यानंतर आदित्य ठाकरेंवर गुन्हा नोंदवायचा की नाही? याचा निर्णय होणार आहे.
यासंदर्भात सालियनच्या कायदेशीर पथकाने समीर वानखेडे यांना याचिकेची प्रत दिली आहे. याचिकेत उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची आणि तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करण्यात आली आहे.
COMMENTS