Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्याधिकारी ढोरजकर यांच्या तोंडाला काळे फासणार

अरेरावीची भाषा वापरल्याबद्दल राजाभाऊ जगताप यांचा इशारा

श्रीगोंदा ः श्रीगोंदा नगरपरिषद कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू असताना आंदोलकांनी शहरातील रस्त्याबाबत व निकृष्ट कामाबाबत विचारना करताच भ

शैक्षणिक संस्था चालक व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची आमदार आशुतोष काळे घेणार बैठक
अण्णा भाऊ साठेंच्या घर नुतनीकरणासाठीआमदार रोहित पवारांनी दिले 15 लाख रूपये
बुऱ्हानगर मंदिरातील भगत पुजारी फैलावतात कोरोनाचा प्रादुर्भाव बुऱ्हानगर ग्रामस्थांचा आरोप

श्रीगोंदा ः श्रीगोंदा नगरपरिषद कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू असताना आंदोलकांनी शहरातील रस्त्याबाबत व निकृष्ट कामाबाबत विचारना करताच भडकलेल्या मुख्याधिकारी ढोरजकर यांनी अरेरावीची भाषा वापरून अपमान केल्याप्रकरणी आरपीआय तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी मुख्याधिकारी ढोरजकर यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनानुसार वेळोवेळी शहरातील निकृष्ट कामाबाबत श्रीगोंदा नगरपालिकेशी पत्रव्यवहार करूनही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दि. 20 नोव्हेंबर रोजी श्रीगोंदा नगरपरिषद येथे शांततेच्या मार्गाने उपोषण सुरु होते. सदरील उपोषण सोडवण्यासाठी मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर हे आले असता त्यांनी उपोषण स्थगित करण्याबाबतचे पत्र आम्हाला दिले. तसेच श्रीगोंदा शहरातील रस्त्याबाबत व निकृष्ट कामाबाबत आम्ही ढोरजकर यांना वारंवार पाठपुरावा व पत्र व्यवहार केला असता तसेच याबाबत मा. जिल्हाधिकारीसाहेब, मा. नगर विकास सहआयुक्त खांडकेकरसाहेब यांचेकडे तक्रार केली असल्याने मुख्याधिकारी यांनी आरपीआय कार्यकर्त्यांचा अरेरावीची भाषा वापरून सर्वांसमक्ष अपमान केला. तसेच तुम्ही ठेकेदारांची तक्रार करू नका त्यांच्या विरोधात तुम्ही कोणाकडेही तक्रार केली तरीही काहीही फरक पडत नाही. तुम्ही कोणाकडेही जा असे अरेराविच्या भाषेत मुख्याधिकारी यावेळी म्हणाले. ढोरजकर हे यापूर्वी श्रीगोंदा नगरपरिषदेत सन 2019-20 साली कॉम्पुटर इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. त्यामुळे मुख्याधिकारी ढोरजकर यांचे संबंधित ठेकेदारांशी असलेले आर्थिक लागेबांधे यातून दिसून येत असून ठेकेदारावर कोणतीही कारवाई करणार नाहीत उलट आमच्या सारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या पदाधिकार्‍यांचा व कार्यकर्त्यांचा जाणीवपूर्वक अपमान वेळोवेळी करत आहेत. तसेच आमच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत आहेत. आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारावर कारवाई होणे आवश्यक असताना मुख्याधिकारी ढोरजकर आम्हाला अपमानित करत आहेत. सदरील भ्रष्ट ठेकेदार व त्यांना पाठीशी घालणारा उद्धट मुख्याधिकारी ढोरजकर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा मुख्याधिकारी ढोरजकर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने सोमवार 27 नोव्हेंबर 2023 पासून दिसेल तिथे तोंडाला काळे फासण्यात येणार असल्याचे आरपीआय तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS