Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वतःच्या करिअरची जबाबदारी स्वतःच घेणार

अकोले रोटरी क्लबच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांचा संकल्प

अकोले/प्रतिनिधी ः माईंड काउन्सलर व करियर कोच असलेले सुधीर फरगडे यांच्या करियर मार्गदर्शन उपक्रमात विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध होऊन, संवाद साधत’ स्

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहावे ः पो.नि.जाधव
वाचन संस्कृतीतर्फे प्रा. विलासराव तुळे यांचा सन्मान
संत भगवान बाबा पुण्यतिथी उत्साहात

अकोले/प्रतिनिधी ः माईंड काउन्सलर व करियर कोच असलेले सुधीर फरगडे यांच्या करियर मार्गदर्शन उपक्रमात विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध होऊन, संवाद साधत’ स्वतःच्या करियरची जबाबदारी स्वतःच घेणार असा संकल्प केला. रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने देवठाण येथील आढळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील 10 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांसाठी ’करियर मार्गदर्शन’ हा विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्या साठी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी 240 विद्यार्थ्यांनी या करियर मार्गदर्शनात सहभाग नोंदवला.
  माईंड काउन्सलर व करियर कोच सुधीर फरगडे यांनी यावेळी विदयार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब अकोले सेंट्रलचे अध्यक्ष सुनील नवले, सचिव प्रा. विद्याचंद्र सातपुते, खजिनदार दिनेश नाईकवाडी, प्राचार्य चंद्रकांत सहाणे, शिक्षक सौ. मीनाक्षी आंबरे, चंद्रकांत नवले, धनंजयभांगरे, सुनील वलवे उपस्थित होते. सुधीर फरगडे यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विदयार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या करियरची जबाबदारी स्वतः घ्यावी, त्यासाठी दुसर्‍यावर अवलंबून राहू नये वा इतरांना जबाबदार धरू नये. यशस्वी लोक सर्वसामान्य माणसांप्रमाणेच असतात पण त्यांची मानसिकता त्यांना विजेता बनवते. कोणत्याही विद्यार्थ्यांनी अशी मानसिकता तयार केल्यास ते देखील यशस्वी होवू शकतात.  आणि तशी मानसिकता निर्माण करताना यशाची काही शास्वत सूत्रे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. करियर निवडताना कोणत्याही दबावात, अथवा तात्पुरत्या इच्छेकडे पाहून करियर निवडू  नका असे त्यांनी सुचवले. आणि यशस्वी होण्यासाठी सध्याच्या युगात सातत्याने शिकत राहण्याची सवय निर्माण करणे, आयुष्याचे ध्येय निश्‍चित करून त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे आणि जीवनात सकारात्मक निती मूल्यांचा विकास करत राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यालयाच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. स्वागत  प्राचार्य चंद्रकांत सहाणे यांनी केले. प्रास्ताविक रोटरी चे सचिव प्रा. विद्याचंद्र सातपुते यांनी करताना रोटरीच्या कार्याचा आढावा घेतला.सूत्रसंचालन शिक्षिका सौ. मीनाक्षी आंबरे  यांनी केले तर आभार धनंजय भांगरे यांनी मानले.

COMMENTS