आत्महत्या करण्याची पोस्ट करून तो झाला बेपत्ता…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आत्महत्या करण्याची पोस्ट करून तो झाला बेपत्ता…

श्रीगोंद्याच्या हवालदाराचा पोलिस दल घेत आहे शोध

अहमदनगर/प्रतिनिधी : अधिकार्‍याच्या जाचाला कंटाळून आत्महत्येची पोस्ट व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर करून श्रीगोंद्याचा पोलिस हवालदार बेपत्ता झाल्याने जिल्हा पोलिस

वाचन संस्कृतीतर्फे माऊली वाचनालयास कपाटभर पुस्तके भेट
प्रीतिसुधाजी स्कूलचा संस्कार फेस्टीवल ठरतोय आदर्श
पोहेगाव केंद्राचे श्रेणीवर्धन करून 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे

अहमदनगर/प्रतिनिधी : अधिकार्‍याच्या जाचाला कंटाळून आत्महत्येची पोस्ट व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर करून श्रीगोंद्याचा पोलिस हवालदार बेपत्ता झाल्याने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या पोलिस हवालदाराचा जिल्हा पोलिस दल शोध घेत आहे. पोलिस ठाण्याच्या व्हॉट्सएपच्या ग्रुपवर आत्महत्या करीत असल्याची पोस्ट टाकली व तेव्हापासून तो पोलीस हवालदार कर्मचारी गायब असल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्यात घडली. त्यामुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. श्रीगोंदा तालुक्यात श्रीगोंदा व बेलवंडी अशी दोन पोलिस ठाणे आहेत. ही दोन्ही पोलिस ठाणी कायम चर्चेत असतात. अशा स्थितीत बेलवंडी पोलिस ठाण्यात एका पोलिस हेडकॉन्स्टेबलने पोलिस ठाण्याच्या व्हॉट्सएपच्या ग्रुपवर आत्महत्या करीत असल्याची पोस्ट टाकली परंतु तेव्हापासून तो गायब असल्याने चर्चेला उधाण आले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडून त्याच पोलिस ठाण्यात कार्यरत असणार्‍या पोलिस हेडकॉन्स्टेबल आजीनाथ खेडकर यांना कायम वेगळ्या दर्जाची वागणूक देत असल्याबाबत चर्चा ऐकण्यास मिळत असे. मात्र, दोन दिवसापूर्वी पोलिस निरीक्षक दुधाळ आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल खेडकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी पोलिस निरीक्षक दुधाळ यांनी खेडकर यांना दमबाजी केल्याची घटना घडली आहे. या सर्व घटनेचा खेडकर यांनी मनात राग धरून त्यांनी बेलवंडी पोलीस ठाण्याच्या व्हॉट्सएपच्या ग्रुपवर…पोलीस निरीक्षक यांच्याकडून मला सारखा त्रास दिला जात असून पोलिस अधीक्षक हे माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत, त्यांना सांगून मी तुला निलंबित करेल, म्हणून पोलिस निरीक्षक यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे…अशी पोस्ट टाकून खेडकर हे दोन दिवसांपासून गायब झाले आहेत. त्यामुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. बेपत्ता खेडकर यांचा शोधही सुरू करण्यात आला आहे.

COMMENTS