Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना त्यांनी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली

खा. डॉ. सुजय विखे यांची विजय औटींवर टीका

सुपे/प्रतिनिधी ः पारनेरचे राजकारण सध्या दडपशाहीच्या जोरावर सुरू असून, स्वार्थाच्या बाजारात ते विकले गेले आहे. आपल्या स्वार्थापायी विजय औटी यांनी

जिल्हा नामांतराचा निर्णय घेतला तर, त्याचे पडसाद उमटतील…
लोकांचे कैवारी बनणाऱ्यांची प्रतिमा येणाऱ्या निवडणुकीत सर्वांसमोर आणू ; खासदार डॉ. सुजय विखे
मताच्या लाचारीसाठी विकास थांबवणारा तुमचा लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही – खासदार डॉ.सुजय विखे

सुपे/प्रतिनिधी ः पारनेरचे राजकारण सध्या दडपशाहीच्या जोरावर सुरू असून, स्वार्थाच्या बाजारात ते विकले गेले आहे. आपल्या स्वार्थापायी विजय औटी यांनी शिवसेनेला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली अशी बोचरी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली. ते पारनेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ पारनेर येथील जाहीर सभेत बोलत होते.  
यावेळी बोलतांना विखे म्हणाले की, मात्र माझ्या शेतकरी वर्गाला ज्या अधिकारी वर्गाने त्रास दिला असेल, त्यांना एका महिन्यातच धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
   खासदार सुजय विखे आपल्या जाहीर सभेतील भाषणात म्हणाले, एकेकाळी गुरु-शिष्य तर काही वर्षे कट्टर विरोधक आणि एकाच रात्री मित्र झाले, तशी मनोमिलनाची नांदी नगरपंचायत पासुनच झाली होती तेच स्पष्ट चित्र आज पहावयास मिळाले. विजय औटी यांनी शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली आहे, अशी टीकाही विखे यांनी यावेळी केली. जाहीर सभेसाठी माजी जि.प.उपाध्यक्ष सुजीत झावरे पाटील,जि,प, सदस्य राहुल शिंदे पाटील, पं.स.सभापती गणेश शेळके, माजी सभापती बाबासाहेब तांबे, सिताराम खालारी, भाजप तालुकाध्यक्ष सुनील  थोरात, विश्‍वनाथ कोरडे, वसंत चेडे, महिला भाजप अध्यक्षा आश्‍विणी थोरात, बाळासाहेब माळी, युवराज पठारे, संजय भोर,बंडु रोहकले, रामचंद्र मांडगे,तुषार पवार, योगेश रोकडे,दिनेश बाबर, सचिन वराळ, शरद सरोदे, बंटी साबळे, यांच्यासह सर्व उमेदवार, विविध सेवा संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व ठिकाणचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, नगरसेवक मोठ्या संखेने उपस्थित होते.

COMMENTS