Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या पीएची तडकाफडकी बदली

सांगली / प्रतिनिधी ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचे पीए (स्वीय सहाय्यक) विजय भोसले यांची तडकाफडकी सामान्य प्रशासन वि

पर्यटन मंत्र्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करण्याची गरज : आ. शशिकांत शिंदे
कामेरीच्या कु. सृष्टी पाटील हिची एनडीए मध्ये निवड
सिल्व्हर ओकवरील हल्ला पूर्व नियोजित कट : ना. जयंत पाटील

सांगली / प्रतिनिधी ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचे पीए (स्वीय सहाय्यक) विजय भोसले यांची तडकाफडकी सामान्य प्रशासन विभागात बदली करण्यात आली आहे. काही ठेकेदाराबरोबर गैरप्रकार झाल्याच्या प्रकरणातून ही बदली झाल्याची चर्चा आहे. सुशांत पाटील यांची नवे स्वीय सहाय्यक म्हणून निवड करण्यात आली आहे.
सांगली जिल्हा परिषदेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून भोसले हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पीए म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी एका ठेकेदाराची फाईल सहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आली होती. मात्र, भोसले यांनी ती फाईल सहीसाठी ठेवली नाही. ठेकेदाराने अनेकवेळा विनंती केली. परंतू दाद दिली नाही. त्यामुळे ठेकेदाराने याची तक्रार थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली, अशी चर्चा आहे. तसेच भोसले हे जिल्हा परिषदेतील खातेप्रमुख आणि अन्य विभागातील कर्मचार्‍यांशी दालनामध्ये उध्दटपणे बोलतात. काही प्रस्ताव जाणीवपूर्वक अडविले जातात. याबाबत काही खातेप्रमुखांनी तक्रार केल्याची माहिती सुत्रांनी दिली. या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेऊन सीईओ यांनी भोसले यांची तडकाफडकी बदली केल्याची चर्चा आहे. भोसले यांची बदली केल्यानंतर त्यांच्या जागी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत पाटील यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे.

COMMENTS