Homeमहाराष्ट्रबीड

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

केज । प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे ज्येष्ठ नेते तथा जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हारुणभाई इनामदार यांच्या वाढदिवसानि

पक्षांतर्गत बंडाळी रोखण्याचे आव्हान !
अहिल्यानगरची हवा युतीच्या बाजूने झुकलेली : खली
गुंड गजा मारणेच्या पत्नीला राष्ट्रवादीची उमेदवारी

केज । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे ज्येष्ठ नेते तथा जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हारुणभाई इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दि. 1 जानेवारी 2026 रोजी केज शहरात विविध सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा नेते लखन हजारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
हारुणभाई इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी उपक्रमांचे नियोजन केले असून सकाळी ठीक 10.00 वाजता ख्वाजा बाबा दर्गा येथे चादर अर्पण करून आशीर्वाद घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सकाळी 10.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. दुपारी 1.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच शहरातील सर्व महामानवांच्या चौकांमध्ये पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहेत.सकाळी 11.15 वाजता उपजिल्हा रुग्णालय, केज येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी 12.00 वाजता बोबडेवाडी रोडवरील स्वामी समर्थ वृद्धाश्रम येथे आजी-आजोबांशी संवाद साधत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर केज शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिक व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यात येणार असून काही प्रभागांमध्ये विकासकामांचे उद्घाटनही होणार आहे. सायंकाळी ठीक 7.00 वाजता बीड रोड, जीवन संकुल व बंसल क्लासेस परिसरात व्यापारी, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच पदाधिकारी व नागरिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यात येणार असून कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने होणार आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जनविकास फाउंडेशनचे सदस्य तसेच हारुणभाई इनामदार यांच्यावर प्रेम करणारे सर्व नागरिक व मित्रपरिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा नेते लखन हजारे यांनी केले आहे.

COMMENTS