नवी दिल्ली -इस्त्रायलमध्ये घेण्यात आलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताने ताज जिंकला आहे. ‘मिस युनिवर्स 2021’चा खिताब भारताच्या हरनाझ संधूने जिंकला.
नवी दिल्ली -इस्त्रायलमध्ये घेण्यात आलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताने ताज जिंकला आहे. ‘मिस युनिवर्स 2021’चा खिताब भारताच्या हरनाझ संधूने जिंकला. 21 वर्षीय हरनाझला 12 डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आला. तब्बल 21 वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला आहे. तिच्या आधी 21 वर्षांपूर्वी लारा दत्ताने 2000 साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता.
हरनाझ संधूमध्ये ‘मिस युनिव्हर्स’ म्हणून तिचे नाव जाहीर होताच ती भावूक झाली. मिस युनिव्हर्सचा खिताब मिळवल्यानंतर हरनाझवर भारतासह जगभरातून वर्षाव केला जात आहे. अनेक सेलिब्रेटींसह राजकीय व्यक्ती, व्यावसायिकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे अभिनंदन केले आहे. यानंतर सोशल मीडियावर हरनाझ संधू असा टॅगही ट्रेंड होताना दिसत आहे. मिस युनिव्हर्सच्या मुकुटाची मानकरी ठरल्यानंतर हरनाझने तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ती म्हणाली, ‘चक दे फट्टे इंडिया’. यानतंर तिचा आणखी एक अधिकृत व्हिडीओ समोर आला आहे. यात ती तिच्या कुटुंबियांचे, देशवासियांचे आभार मानताना दिसत आहे. यावेळी ती म्हणाली, नमस्ते. तुमच्या सर्वांचे धन्यवाद. मी देवाची ऋणी आहे. त्यासोबतच मी माझ्या पालकांचेही आभार मानते. पहिल्या दिवसापासून मला मार्गदर्शन केल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल ‘द मिस इंडिया’ ऑर्गनायझेशनचंही मी आभार मानते. तसेच भारतासाठी 21 वर्षांनंतर मिस युनिवर्सचा किताब परत आणणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, असेही तिने यावेळी म्हटले. चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तीने 2017 मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. 2018 मध्ये, तिला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया 2018 चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया 2019 मध्ये भाग घेतला.
COMMENTS