Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उष्णतेमुळे हरभरा उत्पादकतेला फटका, राज्यातील हरभरा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज 

धुळे प्रतिनिधी - संपूर्ण राज्यात आता हरभरा काढणी वेगाने सुरु झाली आहे. पण हरभरा काढणी जसजशी पुढे सरकतेय, तशी उत्पादन घट पुढे येत आहे. त्यामुळ

वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट
फलटणमध्ये उसाच्या रसासह बायोसिरप आधारीत इथेनॉल प्रकल्प होणार
बिबट्यांची नसबंदी, वन्यजीव हल्ल्याच्या नुकसान भरपाईत कोंबड्यांचा समावेश करावा :आमदार सत्यजीत तांबे

धुळे प्रतिनिधी – संपूर्ण राज्यात आता हरभरा काढणी वेगाने सुरु झाली आहे. पण हरभरा काढणी जसजशी पुढे सरकतेय, तशी उत्पादन घट पुढे येत आहे. त्यामुळे यंदा राज्यातील हरभरा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशात यंदा सर्वाधिक हरभरा लागवड महाराष्ट्रात आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील उत्पादकता यंदा २० ते २५ टक्क्यांनी कमी राहणार आहे. महाराष्ट्रासह  राजस्थान, मध्य प्रदेशातही हरभरा पिकाला उन्हाचा फटका बसत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात यंदा हरभरा लागवडच कमी झाली होती आणि त्यात मागील काही दिवसांपासून दिवसा तापमान जास्त वाढत आहे. त्यामुळं हरभरा उत्पादनात घट पुढे येत आहे.  बाजाराचे लक्ष सध्या महाराष्ट्रातील उत्पादकतेकडे आहे. राज्यात उत्पादकता कमी येत असल्यानं बाजारावर त्याचा परिणामही दिसत आहे. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे.  

COMMENTS