हार्दिक पटेल यांची काँगे्रसला सोडचिठ्ठी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हार्दिक पटेल यांची काँगे्रसला सोडचिठ्ठी

गांधीनगर/वृत्तसंस्था : गुजरात विधानसभा निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली असतांनाच, काँगे्रसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष आण

नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
मस्जिदीत नमाज पठणावर रमजान काळात बंदी
आधी चिमुरडीवर बलात्कार केला, मग मारहाण, धक्कादायक घटना | DAINIK LOKMNTHAN

गांधीनगर/वृत्तसंस्था : गुजरात विधानसभा निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली असतांनाच, काँगे्रसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष आणि पाटीदार समाजाचे दिग्गज नेते हार्दिक पटेल यांनी काँगे्रसला सोडचिठ्ठी दिली आहे. खुद्द हार्दिक पटेल यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
हार्दिक पटेल हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यामुळे गुजरात काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. काँगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच या पत्रात त्यांनी काँगे्रसला खडेबोल देखील सुनावले आहे. अनेक प्रयत्नांनंतरही काँग्रेस पक्षाने देश आणि समाजहिताविरुद्ध काम केल्यामुळे आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे हार्दिक यांनी पत्रात म्हटले आहे. देशातील तरुणांना सक्षम आणि कणखर नेतृत्त्व हवे आहे. परंतु काँग्रेस केवळ निषेधाच्या, विरोधाच्या राजकारणापुरता मर्यादित राहिला आहे. देशातील जनतेला विरोध नाही, तर भविष्याचा विचार करणारा पर्याय हवा आहे, असे देखील हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. दरम्यान, राजस्थानातील उदयपूरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे चिंतन शिबिर पार पडले. या शिबिरानंतर हार्दिक पटेल यांनी पक्षाला रामराम ठोकला. पाटीदार आरक्षण आंदोलनाचा चेहरा म्हणून हार्दिक पटेल देशासमोर आले होते. काही महिन्यांपूर्वीच हार्दिक पटेल यांनी राहुल गांधी यांची भेट घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण, हार्दिक पटेल यांनी पक्षश्रेष्ठींबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसच्या नेतृत्त्वावरुन काही प्रश्‍न उपस्थित करत हार्दिक पटेल यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. हार्दिक पटेल यांच्या या निर्णयामुळे त्यांचे भाजप नेत्यांकडून कौतुक केले जात आहे. त्यामुळे हार्दिक पटेल आता भाजपची कास धरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हार्दिक आता काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS