Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत ठेकेदाराच्या घरी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

लग्नात 18 तोळे आणि फर्निचरला 10 लाख दिले तरी 8 लाखाची मागणी

देवळाली प्रवरा ः लग्नात आठरा तोळे सोने केले, फर्निचरला 10 लाख दिले तरी लग्नानंतर बांधकाम व्यवसायासाठी खडीचे मिक्सर घेण्यासाठी तसेच बोलेरो घेण्यास

एसटी डेपो मंजूर करता आला नाही त्यांचे एमआयडीसीचे आश्‍वासन
मोदींसमोरचे कौतुक ठरले फोल…ठाकरेंने आणले वास्तवात ;अहमदनगर जिल्ह्याची कोरोनाने केली ससेहोलपट
पढेगावच्या शिंदे दाम्पत्याचे तीन तासाच्या अंतराने निधन

देवळाली प्रवरा ः लग्नात आठरा तोळे सोने केले, फर्निचरला 10 लाख दिले तरी लग्नानंतर बांधकाम व्यवसायासाठी खडीचे मिक्सर घेण्यासाठी तसेच बोलेरो घेण्यासाठी पैशाची मागणी करून विवाहितेचा छळ करणार्‍या राहुरी तालुक्यातील ठेकेदार कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              याबाबत राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील  सोनवणे वस्ती, टाकळीमिया, ता. राहुरी या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जून 2021 रोजी आपला विवाह कुणाल सुरेश सोनवणे यांचेशी राहुरीतील पांडुरंग लॉन्स येथे मानपान देवून थाटामाटात करण्यात आला.सासरच्या मागणीप्रमाणे 18 तोळे सोने, तसेच 10 लाख रुपये फर्निचर घ्यायला आणि 60 हजाराचा घर संसार लग्नात दिला. काही दिवस सासरी नांदवल्यानंतर सहा महिन्यांनी सासूने, पतीने, नणंद, आणि नंदई यांनी आपल्याकडे पैशाची मागणी केली. आपला ठेकेदारी व्यवसाय असल्याने आपण त्यात वाढ करु त्यासाठी सिमेंट, खडी, वाळूचे काम करण्यासाठी मिक्सर घ्यायचे असल्याने त्यासाठी तुझ्या वडिलांकडून आठ लाख रुपये घेऊन ये, अशी त्यांनी मागणी केली. परंतु लग्नात आत्ताच एवढा खर्च केला असल्याने आपण त्यास नकार दिला.त्यामुळे मला बेदम मारहाण करुन भिंतीवर ढकलून   मेकपच्या आरशावर आदळून जखमी केले. उपचारासाठी गिरगुणे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.या मारहाणीनंतर याबाबत वडिलांना सांगितले वडिल हॉस्पिटलला भेटायला आल्यावर त्यांना सासरच्या लोकांची मागणी सांगितली. त्यानंतर दवाखान्याचा खर्च वडिलांनी केला.तेंव्हा पोलिसात तक्रार केली नाही. त्यानंतरही आपल्याला विनाकारण शिवीगाळ, दमदाटी त्रास देणे सुरु केले.याच कारणावरुन नातेवाईकांनी मध्यस्थी करुन मला सासरी त्रास होवू नये म्हणून वडिलांनी दोन लाख रुपये पती व सासर्‍यांकडे आणून दिले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा राहुरीत फ्लॅट घेऊन द्या अशी. मागणी केली. त्यानंतर सासर्‍यांनी आपल्याला बोलेरो जीप घ्यायची आहे. असे म्हणत आपल्याकडील सर्व दागिण्यांची मागणी केली.. त्यास आपण नकार दिल्याने माझ्या पतीने कपाट तोडून लग्नातील माझे सर्व दागिणे घेऊन गेले. सासरच्या छळाला व मारहाणीला कंटाळून आपण पोलिसात ही फिर्याद देत असल्याचे प्रतिक्षा सोनवणे यांनी म्हटले आहे. सदर फिर्यादीवरुन कुणाल सुरेश सोनवणे, सुरेश जगन्नाथ सोनवणे, नंदा सुरेश सोनवणे सर्व रा. टाकळीमिया, ता. राहुरी, ऐश्‍वर्या सुरेश घाडगे, सुरज अशोक घाडगे, अशोक रामचंद्र घाडगे सर्व रा.मल्हारवाडी, ता. राहुरी यांच्या विरोधात भादंवि कलम 323,34, 498 अ, 504, 506 प्रमाणे राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलिस करीत आहे.

COMMENTS