देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी शहरात भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या शेतकर्यांची येथील व्यापार्याने हेळसांड करुन अर्वोच्च भाषा वापरुन जागेवरुन उ

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी शहरात भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या शेतकर्यांची येथील व्यापार्याने हेळसांड करुन अर्वोच्च भाषा वापरुन जागेवरुन उठवुन लावल्याच्या निषेध सोशल मीडियातून करण्यात इल्यावर काही तरुणांनी एकत्र येत भाजीपाला विक्रेता शेतकरी इस्माईलभाई देशमुख यांच्यासह नगरपालिकेस निवेदन देवुन शेतकर्यांची हेळसांड थांबवावी अशी मागणी करण्यात आली.
नगरपालिकेने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी तातडीने नोटीस काढुन 12 मे पासून प्रत्यक्ष कारवाईला सुरवात करणार आहे. अवकाळी पावसाबरोबर शेतीमालाच्या भावाचे संकटाचे शेतकर्यांच्या डोक्यावर टांगती तलवार असून शेतात स्वकष्टाने पिकविलेला भाजीपाला सोमवारी राहुरी शहरात बारागाव नांदुर येथील इस्माईलभाई देशमुख हे विक्रीसाठी घेवुन आले एका दुकाना समोर गोणी अंथरुन विक्रीसाठी बसले असता त्या दुकानदाराने या शेतकर्यांस नको त्या भाषेत बोलुन दुकाना समोर बसायचे नाही असा सज्जड दम दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्याने या व्यापार्याचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला तालुक्यातील बारागाव नांदुर येथील ग्रामीण भागातील इस्माईलभाई देशमुख हा शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी राहुरी शहरात एका दुकाना समोरील डांबरी रस्त्यावर एक गोणी अंथरुन भाजीपाला विक्री करीत असताना रस्त्याच्या कडेला असेलेल्या गाळ्यातील व्यापार्याने या शेतकर्यांस नको ती भाषा वापरुन या ठिकाणी भाजीपाला विकायचा नाही. असा दम देत शेतकर्यांच्या हातातील मोकळ्या गोण्या हिसकावुन घेत शेतकर्यांची हेळसांड केली. शेतकर्याला शेतीमाल पिकवताना जुगार खेळावा लागतो. नर्सिग आपत्ती कधी कोसळेल व मानवाच्या हातातील मालाची किमंत कधी कोसळेल हे सांगू शकत नाही.त्यामुळे शेती धंदा म्हणजे एक प्रकिरचा जुगार खेळे समजले जाते. शेतकरी रोजीरोटी भागविण्यासाठी थोडाफार भाजीपाला शहरात विक्री साठी आणतात परंतू विक्री करण्यापुर्वी शेतकर्यांला संकटाला सामोरे जावे लागते. राहुरी शहरातील व्यापार्याने बारगाव नांदुर येथील शेतकरी इस्माईलभाई देशमुख यांचा अवमान केला त्याबद्दल सोशल मिडीयावर तिखट प्रतिक्रीया उमटल्या. व्यापार्यासह नगर पालिकेस जाब विचारला गेला पाहिजे अशी मते पुढे आली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातुन अनेकांनी शेतकर्यांची त्या व्यापार्याने माफी मागितली पाहिजे.अन्यथा नगर पालिकेने त्या व्यापार्यावर कारवाई केली पाहिजे अशा पोष्ट फिरत होत्या. मंगळवारी सकाळी बारगाव नांदुर येथिल शेतकरी इस्माईलभाई देशमुख यांच्या सह काही तरुण शेतकरी एकञ येत नगर पालिकेस जाब विचारण्यासाठी पोहचले.राहुरी नगर पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक विकास घटकांबळे यांना निवेदन देवुन त्या व्यापार्यावर कारवाई करुन भाजीपाला विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली. यावेळी विक्रम कुमार गाढे, अॅड भाऊसाहेब पवार, राजेद्र गोपाळे, विलास मंडलिक, बापुसाहेब काळे, असिफ देशमुख, सरदार पठाण, पिलाल देशमुख, खलिबा देशमुख आदी उपस्थित होते.
COMMENTS