Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हर घर तिरंगा अभियान’ राहाता शहरात सुरुवात

तिरंगा बरोबर सेल्फी काढून आपल्या सोशल अकाउंटवर ठेवा : मुख्याधिकारी वैभव लोंढे

राहाता ः हर घर तिरंगा अभियानाची राहाता शहरात सुरूवात झाली असून, 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येकाने आपापल्या घरावर तिरंगा झेंडा लावावा, असे

कोरोना रुग्णांच्या बिलात बायोवेस्टेजचे शुल्क ; या लुटालुटीला मनपा जबाबदार असल्याचा मनपाचा आरोप
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित
अमृतवाहिनी आयटीआयच्या 42 विद्यार्थ्यांची निवड

राहाता ः हर घर तिरंगा अभियानाची राहाता शहरात सुरूवात झाली असून, 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येकाने आपापल्या घरावर तिरंगा झेंडा लावावा, असे आवाहन राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी केले. या अभियानाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या डीपीवर तिरंगा ध्वज ठेवून प्रथम केली.
या अभियानात राहाता शहराने सुद्धा सहभाग घेऊन या अभियानाला शहरात सुरुवात झाली. हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत आज राहाता नगर परिषदेने  तसेच नागरिकांच्या समवेत  शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात पी.जी.एस.एस.शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब साळवे, विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी त्यांचे सहकारी व नागरीक संख्येने या रॅलीत सहभागी झाले. शहरातील प्रत्येक नागरिकांनी घर,ऑफिस, दुकानावर तिरंगा ध्वज लावावा. व तिरंगा ध्वजा बरोबर आपला एक सेल्फी फोटो काढून तो आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर अपलोड करावा. हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोहिमेअंतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आली. 22 जुलै 2022 रोजी स्वतः पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून दरवर्षी ही मोहीम राबवली जाते.2023 मध्ये 10 करोड देशातील नागरिकांनी तिरंगा ध्वजा बरोबर फोटो काढून आपल्या डीपी वर ठेवला होता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सण खास बनवण्यासाठी केंद्र सरकारने 9 ऑगस्टपासून देशभरात प्रत्येक घरात तिरंगा मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे.15 ऑगस्टपर्यंत चालणार असल्याची माहिती मुख्याधिकारी लोंढे यांनी दिली. तसेच प्रत्येकाने तिरंगा ध्वज आपल्या घरावर लावावा असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम आढाव सर यांनी केले. तर आभार पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी अशोक साठे यांनी मानले.

COMMENTS