Homeताज्या बातम्यादेश

फेसबुक live वर घेतली गळफास

लखनऊ: उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात आत्महत्येची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ३५ वर्षीय तरुणानं फेसबुक लाईव्ह करत पंख्याला गळफास लाव

स्वाभिमानासाठी येणारी निवडणूक जिंकावी लागेल
धारावीत लागलेल्या आगीत सहा जण होरपळले
निवडणूक होणे हे लोकशाहीचे तत्त्व !

लखनऊ: उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात आत्महत्येची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ३५ वर्षीय तरुणानं फेसबुक लाईव्ह करत पंख्याला गळफास लावून जीव दिला. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तरुणाचं घर गाठलं आणि मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तरुणानं फेसबुक लाईव्ह करत सुरुवातीला कुटुंबियांची माफी मागितली. ‘माझ्या घरासमोर हरलो, भावांसमोर हरलो. आपल्या वाटणाऱ्या काही माणसांकडून हरलो. माझ्या पत्नीची माफी मागतो. माझ्या कुटुंबाची आणि वडिलांची माफी मागतो. पप्पा, मला माफ करा. तुम्हाला जसा मुलगा हवा होता, तसा मी होऊ शकलो नाही. एक रुपयादेखील कमावू शकलो नाही. पण मी तुमचा आदर करतो. पप्पा रडू नका. माझी मिशी टाईट ठेवा,’ असं तरुणानं आत्महत्येपू्र्वी फेसबुक लाईव्हवर म्हटलं.

COMMENTS