मुंबई प्रतिनिधी - माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सदानंद कदम यांच्या मालकीच्या खेट येथील साई रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याचे

मुंबई प्रतिनिधी – माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सदानंद कदम यांच्या मालकीच्या खेट येथील साई रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याचे काम सुरू झाले आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबद्दलचा व्हिडिओ एक्स वर टाकला आहे. रिसॉर्टचे पाडकाम करत असतानाच अनिल परब आणि सदानंद कदम यांच्यावर फौजदारी कारवाईदेखील होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी एक्स वर पोस्ट टाकून दोन दिवसात रिसॉर्ट पाडण्याचे काम सुरू होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज रिसॉर्टचे पाडकाम सुरू झाले आहे. साई रिसॉर्टचे बांधकाम सीआरझेडच्या नियमाचे उल्लंघन करून बांधण्यात आले आहे. याबद्दल परब यांच्यावर गुन्हा दाखल असून ते जामिनावर बाहेर आहेत, असेही किरीट सोमय्या यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असताना अनधिकृत आणि अतिरिक्त बांधकाम स्वखर्चाने पाडू, असे प्रतिज्ञापत्र सदानंद कदम यांनी दिले होते. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार रिसॉर्टच्या तिसऱ्या मजल्यावरचे बांधकाम पाडण्याचे काम सुरु झाले असून पुढचे दोन-तीन दिवस हे काम चालणार आहे
COMMENTS