मुंबई : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी काही तासांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप केल्यानंतर क
मुंबई : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी काही तासांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप केल्यानंतर काही तासांतच बुधवारी आमदार अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई सुरू झाली आहे. दापोली इथे ही कारवाई सुरू असून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या कारवाईचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत.
अनिल परब व सदानंद कदम यांनी सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करून दापोलीतील मुरुडच्या समुद्र किनार्यावर साई रिसॉर्ट बांधल्याचा आरोप होता. हे रिसॉर्ट बांधताना 200 मीटरच्या आत बांधकाम केल्याचा आक्षेप होता. या प्रकरणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 14 नोव्हेंबर 2022 रोजी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीत जाऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पर्यावरण विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर काल अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप केले होते. सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या घोटाळ्याच्या विरोधातही आवाज उठवावा आणि ईडी चौकशीची मागणी करावी, असे अनिल परब म्हणाले होते. तसेच, येत्या काळात रामदास कदम यांचे 12 ते 13 घोटाळे बाहेर काढू, असा इशारा दिला होता. त्यानंतर परब यांच्याच रिसॉर्टवर कारवाई झाली आहे.
COMMENTS