Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्त्याच उद्घाटन फटाके फोडत गुत्तेदारांनी केला स्वतःचा मोठेपणा

किनवट प्रतिनिधी -  स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर सनदी अधिकार्‍यांच्या प्रयत्नाने आदिवासी अतिदुर्गम पिंपळशेंडा या गावाला पहिल्यांदाच नागापूर ते प

देशात 24 तासामध्ये 10 हजार 15 नवे रूग्ण
अमेरिकास्थित माजी विद्यार्थ्यांने योगेश्वरी शाळेला दिले व्हाईट बोर्ड
महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

किनवट प्रतिनिधी –  स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर सनदी अधिकार्‍यांच्या प्रयत्नाने आदिवासी अतिदुर्गम पिंपळशेंडा या गावाला पहिल्यांदाच नागापूर ते पिंपळशेंडा 8.200 कि. मी. सी सी रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजुरी मिळाली होती. संबंधित गुत्तेदाराने अंदाजपत्रकानुसार काम न करता निकृष्ट दर्जाचे काम करन्यावर अधिक भर दिला होता. त्यामध्ये प्रथम या रस्त्यावर बारा फूट रुंदी मध्ये जी एस बी मुरूम खडीचा प्रकार टाकून चार इंच जाडीत पाणी टाकून व्हायब्रेटर रोलरने दबाई करणे, दुसर्‍यांदा बारा फूट रुंदी मध्ये दीड इंचाची कृषी 40 एम एम गिट्टी चा तीन इंचाचा थर मुरमासह पाणी टाकून व्हायब्रेटर रोलर  दबाई करणे, तिसर्‍यांदा दबाई झालेल्या रस्त्यावर 11 फूट रुंदीत काँक्रीट पेवर मशीनने 6 इंच जाडीचा 30 एम.एम. काँक्रीटचा थराचा सीसी रस्ता तयार करणे असे अंदाज पत्रकात नमूद असताना देखील  अभियंता व गुत्तेदाराच्या संगनमताने जीएसबी मुरूम खडीचा प्रकार रस्त्यावर टाकला नाही. केवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाली खोदून  निघालेली माती रस्त्यावर टाकली आणि त्यावरच दीड इंचाची क्रशची 40 गिट्टी टाकून त्यावर मुरूम व पाणी न टाकता दबाई सुद्धा केली नाही. अशा उघड्या गिट्टीवरच पेवर मशीन न वापरता सीसी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत  वृत्त प्रकाशित करताच केवळ देखावा म्हणून व्हायब्रेटर दबाई या रस्त्यावर आणली होती. 220 किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदेड येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंते या कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलायला तयार नाहीत. जीएसबी न केलेल्या हातुर माथुर रस्त्यावर सीसी रस्ता पूर्ण केला. संबंधित गुत्तेदाराने युट्युब न्यूज चैनल च्या झोरे उचल्या तथाकथित  भामट्यांना हाताशी धरून या रस्त्यावर फटाक्यांची आतिषबाजी करून ड्रोन कॅमेरा द्वारे या रस्त्याची चित्रफित तयार करून आम्ही कठीण परिस्थितीत किती चांगले काम केले. हा रस्ता निकृष्ट दर्जाचा केलेला नाही असा आव दाखविण्याचा  त्यांनी खटाटोप केला आहे  . परंतु या रस्त्याची मुख्य अभियंता स्तरावरून चौकशी  बाबत तालुक्यातील सुजान नागरिकाकडून प्रधान सचिव ग्रामीण विकास मंत्रालय महाराष्ट्र शासन यांना निवेदनाद्वारे लक्ष वेधून संबंधित यंत्रणेच्या अभियंत्यावर व गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी  करण्यात येणार असल्याची चर्चा शहरात होत आहे.

COMMENTS