Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

पुणे : राज्यात बंदी असताना देखील मानवी शरीरास अपायकारक असणार्‍या गुटख्याचा बेकायदेशिररित्या साठा करणार्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट एक ने गजा

महिलेच्या बॅगेतून निघाले तब्बल २२ साप
भीषण अपघात, दोघांचा जागीच अंत | LOKNews24
जरांगेंच्या आमरण उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा

पुणे : राज्यात बंदी असताना देखील मानवी शरीरास अपायकारक असणार्‍या गुटख्याचा बेकायदेशिररित्या साठा करणार्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट एक ने गजाआड केले आहे. त्याच्याकडील चौकशीत तब्बल 3 लाख 68 हजारांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. सुशीलकुमार रामचंद्र पांडे (वय -45, रा. आलेपाक बिल्डीग, गुरूवारपेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुण्यातील गुरूवार पेठेतील कस्तुरे चौकातील एका दुकानात बेकादेशिररित्या गुटख्याचा साठा करून ठेवला असल्याची महिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली होती. त्यानुसार गुन्हेशाखेने संबधित ठिकाणी छापा टाकला असताना पांडे याच्या ताब्यात असलेला तब्बल 3 लाख 68 लाखांचा गुटखा, पानमसाला तसेच तंबाखुजन्य पदार्थाचा साठा सापडला. या कारवाईमुळे गुटखा विक्रेते शहरात सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. त्याच बरोबर शहरासह उपनगरात गुटखा पुरविणार्यांसह विकणारे मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. विविध ठिकाणी सर्रास गुटख्याची विक्री होत असताना अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांकडून मात्र नावापुरतीच कारवाईच होताना दिसते आहे. पुणे शहरातील कात्रज आगारातील पीएमपी बसच्या बॅटर्या चोरण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत पीएमपी चालक विश्‍वास जाधव (वय 46, रा. शिवशंभोनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कात्रज आगारातील पीएमपी बस शिवशंभोनगर परिसरातील मोकळ्या जागेत लावण्यात येतात. मध्यरात्री चोरट्यांनी पीएमपी बसच्या दोन बॅटर्या चोरुन नेल्या. बॅटरी चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिस कर्मचारी कैलास आखुटे तपास करत आहेत.

COMMENTS