Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुरुकुल स्कूल ठरली संपूर्ण लसीकरण करणारी सातारा जिल्ह्यातील पहिली शाळा

सातारा / प्रतिनिधी : दि. 3 जानेवारीपासून भारतात 15 ते 18 वयोगटामधील विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला. सातारा शहरातील शाहु

लोकशाहीच्या वृध्द्धीसाठी तरुणांनी मतदान करावे : जीवन गलांडे
साहेब तुम्ही राज्यात फिरा; गुजरात धार्जिण्य, जातीयवादी युतीचे सरकार खाली खेचा
आबा गट इस्लामपूर पालिका निवडणुकीत 4 प्रभाग लढविणार

सातारा / प्रतिनिधी : दि. 3 जानेवारीपासून भारतात 15 ते 18 वयोगटामधील विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला. सातारा शहरातील शाहुनगर येथील गुरुकुल स्कूलच्या 15 ते 18 दरम्यान वय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्याच दिवशी 100 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करणारी गुरुकुल सातारा जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. शाळा व्यवस्थापन, शिक्षक व पालकांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले.
यावेळी गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणिस दीपक प्रभावळकर, मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, उपमुख्याध्यापिका अनुराधा कदम, जनसंपर्क अधिकारी विश्‍वनाथ फरांदे, माध्यमिक विभाग प्रमुख सोनाली तांबोळी व शिक्षक उपस्थित होते.
कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले, कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्हीही लस सुरक्षित असून याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून त्यांचे आरोग्यास प्राधान्य देणे ही आपली नैतिक जबाबदारी समजून व लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी शाळेमधील 15 ते 18 वय पुर्ण केलेल्या 165 विद्यार्थ्यांचे लसीकरण जिल्हा रुगणालया मार्फत 100 टक्के पुर्ण करण्यात आले.
गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यावेळी बोलताना म्हणाले, केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या लसीचा उपक्रम स्तुत्य आहे. या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांनी लसवंत व्हावे. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी जागरूक राहुन वेळीच स्वतःच्या पाल्याला लस द्यावी, असे मत व्यक्त करुन गुरुकुलच्या पालकांनी लसीकरणासाठी संमती दिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानले. तसेच पहिल्याच दिवशी राबविण्यात आलेल्या 100 टक्के लसीकरणाची इतिहासात नक्कीच नोंद घेतली जाईल.
या लसीकरण मोहिमे प्रसंगी मधुकर जाधव, अ‍ॅड. राजेंद्र बहुलेकर, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दिपक मेथा, जगदिश खंडेलवाल सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वाती फणसे यांनी केले.


रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात 775 विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचे डोस
प्राथमिक आरोग्य केंद्र रहिमतपूर येथील कर्मचारी यांच्यामार्फत 15 ते 18 वर्षे वयोगटातील एकूण 775 विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीचे डोस देण्यात आले. दि. 3 जानेवारी 2022 पासून राविण्यात येणार्‍या या मोहिमेमध्ये शाळा व शाळाबाह्य 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुले-मुली यांना कोविड-19 लस देण्यात येणार आहे.
यावेळी कोविड-19 या आजारावर नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी लसीकरणाविषयी माहिती देण्यात आली. तसेच पालकांमधील लसीकरणाबाबतच्या शंकांचे निरसन करण्यात आले. सर्व पालक वर्ग यांनी आपल्या 15-18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. लसीकरण दर सोमवारी व शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आयोजित करण्यात येईल.

COMMENTS