Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवगुण सोडून सद्गुण धारण करणे हिच गुरुदक्षिणा ः  सरला दीदी

कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्‍वर विद्या प्रसारक संस्थेचे संत ज्ञानेश्‍वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे रविवारी 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे रोज 40 जणांचा मृत्यू!
भंडारदरा धरणात पर्यटकाचा बुडून मृत्यू
संदीप कोतकर यांच्यावरील जिल्हाबंदी उठवली

कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्‍वर विद्या प्रसारक संस्थेचे संत ज्ञानेश्‍वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे रविवारी 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा सोहळा प्रजापती ब्रह्मकुमारी अध्यात्मिक केंद्र, कोपरगावच्या सरला दीदी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शहीद जवान सुनील वल्टे यांच्या पत्नी मंगल वल्टे व संदीप भाई यांच्या उपस्थित मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे, उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे व शिक्षिका ऋतुजा कुलकर्णी यांच्या हस्ते अध्यक्ष व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तर विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत अशीर्वाद घेतले.
या प्रसंगी सरला दिदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, अवगुण सोडून सद्गुण धारण करणे हिच गुरुदक्षिणा गुरुपौर्णिमेला आपल्या शिक्षक रुपी गुरूंना द्यावी. आपल्या जीवनात विद्यार्थी दशेत असतांना अभ्यासकडे व मैदानी खेळाकडे लक्ष केंद्रित करावे.तसेच आपल्या आई वडिलांचा व शिक्षकांचा आदर करावा व मोबाईल पासून दूर राहावे. वाईट गुणांचा त्याग करून चांगले गुण अंगीकारावे असे मोलाचे मार्गदर्शन सरला दीदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना केले. तर  इयत्ता दहावीतील विद्यार्थिंनी प्रभज्योतकौर नूरी, अदिती बारहाते व गायत्री कदम यांनी गुरुपौर्णिमेच्या विषयावर आपले मत व्यक्त करत सर्वाना शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी श्रद्धा शिंदे व जोया शेख यांनी केले तर आभार प्राची पहिलवान व शिक्षिका संगीता गाडे यांनी मानले.

COMMENTS