Homeताज्या बातम्यादेश

गुरमीत राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल मंजूर

नवी दिल्ली ः हरियाणामधील वादग्रस्त पॅरोल निर्णयाने पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघतांना दिसून येत आहे. बलात्कार आणि खून प्रकरणात

लग्नाळू पोरांना फसवणारी टोळी गजाआड | LOK News 24
इंदापूरला ’उजनी’तून पाणी देण्याचा निर्णय रद्द
महिला सहकाऱ्याला केसांना पकडून ओढत नेलं, रस्त्यावरच बेदम मारहाण

नवी दिल्ली ः हरियाणामधील वादग्रस्त पॅरोल निर्णयाने पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघतांना दिसून येत आहे. बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. रोहतकच्या सुनारिया जिल्हा कारागृहातून तो लवकरच बाहेर पडून सिरसा येथील डेरा सच्चा सौदा आश्रमात जाणार आहे.
गेल्या आठ वर्षांच्या कारावासाच्या कालावधीत राम रहीम याला मिळालेला हा 15 वा पॅरोल असून, 2026 मधील तुरुंगाबाहेरील ही त्याची पहिलीच हजेरी ठरणार आहे. विशेष म्हणजे, यावर्षीच त्याला याआधी तीन वेळा पॅरोल किंवा तात्पुरती सुटका मिळालेली आहे. डेरा सच्चा सौदाचे दुसरे गुरु शाह सतनाम जी यांच्या जन्ममासानिमित्त हा पॅरोल मंजूर झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या आगमनाच्या पार्श्‍वभूमीवर सिरसा येथील डेरा परिसरात हालचाली वाढल्या असून, तयारीलाही वेग आला आहे. मात्र, राम रहीमला वारंवार मिळणार्‍या पॅरोलमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 2017 मध्ये दोषी ठरल्यापासून आजपर्यंत त्याला मिळालेल्या सुट्यांची संख्या आणि कालावधी पाहता प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. याआधी जानेवारीत 30 दिवसांचा, तर एप्रिलमध्ये 21 दिवसांचा पॅरोल त्याला देण्यात आला होता. मागील पॅरोलही 40 दिवसांचा होता आणि यावेळीही तेवढाच कालावधी मंजूर करण्यात आला आहे. ऑगस्ट 2017 मध्ये दोन महिला अनुयायांवरील बलात्कार प्रकरणात राम रहीमला 20 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निकालानंतर पंचकुला आणि सिरसा परिसरात उसळलेल्या हिंसाचारात सुमारे 40 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये, पत्रकार रामचंद्र यांच्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

COMMENTS