गुजरात:विषारी दारूमुळे मरणाऱ्यांची संख्या 25 झाली

Homeताज्या बातम्यादेश

गुजरात:विषारी दारूमुळे मरणाऱ्यांची संख्या 25 झाली

अहमदाबाद : गुजरातमध्ये विषारी दारू पिऊन मरणाऱ्यांची संख्या 25 झाली आहे. याप्रकरणी गुजरात सरकारने चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. आतापर्यंत बनावट दा

आ.डॉ.राहुल आहेर यांनी केली दरेगाव येथे पिकांची पाहणी
संतापजनक! शिक्षकाने मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यास रोखले.
सिव्हील हॉस्पिटल आगप्रकरणी अखेर डॉ. पोखरणाला अटक

अहमदाबाद : गुजरातमध्ये विषारी दारू पिऊन मरणाऱ्यांची संख्या 25 झाली आहे. याप्रकरणी गुजरात सरकारने चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. आतापर्यंत बनावट दारू बनवणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्या एकूण 13 जणांना अटक करण्यात आलीय. यामध्ये दारू विक्रेत्यांना मिथेनॉल पुरवणाऱ्याचा देखील समावेश आहे.
गुजरातमध्ये दारूबंदी असल्याने राज्यात अनेकदा तस्करीच्या माध्यमातून इतर राज्यांमधून दारू आयात केली जाते. तसेच विविध रसायनांचा नशेसाठी वापर केला जातो. गुजरातच्या होताडमधील रोजित गावात काही लोकांनी एका कॅमिकल कंपनीतून रसायन चोरून आणले. तसेच हे कॅमिकल लोकांना देशी दारू म्हणून विकण्यात आले. हे विषारी रसायन पिल्यानंतर अनेकांची प्रकृती खालावली. यात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला असून इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. याप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. तसेच पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केलीय. याप्रकरणी आणखी काही लोकांना ताब्यात घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले . याप्रकरणी तपास पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना अतिशय भीषण असून दारूच्या नावाखाली लोकांना विषारी केमिकल पाजण्यात आलेय. या घटनेमागे इतर काही कारणे असल्याचा पोलिसांना संशय असून त्यादिशेने देखील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

COMMENTS