Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक चव्हाण-अजित पवारांमध्ये ’गुफ्तगू’

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्र काँगे्रसमध्ये देखील फूट पडणार असून, अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा

शिरूरमधून आमचाच उमेदवार निवडून आणू
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पाय खोलात
अर्थखाते टिकेल की नाही सांगता येत नाही

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्र काँगे्रसमध्ये देखील फूट पडणार असून, अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. ज्यादिवशी विधानसभेचा विरोधीपक्षनेता जाहीर होईल त्याचदिवशी राजकीय स्फोट होईल असे वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केले होते. त्यानंतर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांची काँगे्रस नेते अशोक चव्हाण यांनी भेट तब्बल एक तास बंद  चर्चा केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवारांच्या दालनात अशोक चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर ’गुफ्तगू’ झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विधानसभेमध्ये काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेते पद आले आहे. या पदावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही दावा होता. मात्र, पक्षाच्या वतीने विजय वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अशोक चव्हाण नाराज झाले काय? असा प्रश्‍नही या निमित्त उपस्थित केला जात आहे.

COMMENTS