Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांसह नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी रक्षक दल; संगमनेर नगरपरिषदेचा निर्णय ; महाराष्ट्रात प्रथमच रक्षकदल कार्यान्वित

संगमनेर : शहरात महिला मुली व नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रथमच नगरपरिषदेच्या पुढाकारातून रक्षक दल ही संकल्पना राबविण्यात  आली.  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रक्षक दलाचा शुभारंभ केला. यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, एकविराच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, नितीन अभंग, दिलीपराव पुंड, किशोर टोकसे, नगरसेविका सीमा खटाटे  आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.  संगमनेर शहरातील महिला मुली व नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेबरोबरच नगरपरिषदेने तात्काळ सुरक्षा मिळावी याकरता आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून राज्यात प्रथमच रक्षक दल स्थापन केले आहे. कुठे काही अनुचित घटना घडल्यानंतर तात्काळ 9067273273 या नंबर वर संपर्क केल्यास रक्षक दल उपस्थित राहणार आहेत. यामुळे गैरवर्तन करणाऱ्यांना मोठी चपराक मिळणार आहे. आयडीबीआय बँकेच्या वतीने नगर परिषदे करता चार चाकी वाहन व दोन बुलेट गाडी दिली असून या माध्यमातून हे जवान तात्काळ उपस्थित राहणार आहेत.  यावेळी नगराध्यक्ष डॉ मैथिली  तांबे म्हणाल्या की संगमनेर नगर परिषदेच्या सर्व कामांमध्ये नागरिकांचा मोठा सहभाग असून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ही अभिनव संकल्पना राबवण्यात आली आहे याचबरोबर विविध विकास कामांमधून संगमनेर हे सर्वांना सोबत घेऊन आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे असे त्या म्हणाल्या.

Sangamner : तिसरी लाट थांबवायची असेल तर प्रत्येकाने लसीकरण करणे आवश्यक (Video)
संगमनेर गोवंश कत्तलखाना कारवाई प्रकरण; प्रांत कचेरीसमोर ठिय्या आंदोलन
Sangamner : कोविडचे नियमच तहसीलदार अमोल निकम यांनी बसवले धाब्यावर (Video)

संगमनेर : शहरात महिला मुली व नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रथमच नगरपरिषदेच्या पुढाकारातून रक्षक दल ही संकल्पना राबविण्यात  आली.

 सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रक्षक दलाचा शुभारंभ केला. यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, एकविराच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, नितीन अभंग, दिलीपराव पुंड, किशोर टोकसे, नगरसेविका सीमा खटाटे  आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.

 संगमनेर शहरातील महिला मुली व नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेबरोबरच नगरपरिषदेने तात्काळ सुरक्षा मिळावी याकरता आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून राज्यात प्रथमच रक्षक दल स्थापन केले आहे. कुठे काही अनुचित घटना घडल्यानंतर तात्काळ 9067273273 या नंबर वर संपर्क केल्यास रक्षक दल उपस्थित राहणार आहेत. यामुळे गैरवर्तन करणाऱ्यांना मोठी चपराक मिळणार आहे. आयडीबीआय बँकेच्या वतीने नगर परिषदे करता चार चाकी वाहन व दोन बुलेट गाडी दिली असून या माध्यमातून हे जवान तात्काळ उपस्थित राहणार आहेत.

 यावेळी नगराध्यक्ष डॉ मैथिली  तांबे म्हणाल्या की संगमनेर नगर परिषदेच्या सर्व कामांमध्ये नागरिकांचा मोठा सहभाग असून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ही अभिनव संकल्पना राबवण्यात आली आहे याचबरोबर विविध विकास कामांमधून संगमनेर हे सर्वांना सोबत घेऊन आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे असे त्या म्हणाल्या.

COMMENTS