सांगलीत संविधान स्तंभाचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगलीत संविधान स्तंभाचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण

सांगली प्रतिनिधी - सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्य

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ ; जात पडताळणी समितीकडे तक्रार
क्रिप्टोचा खेळ संपला, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा – कडलग
सुरगाणा, कळवण तालुक्यातील सिंचन योजनांना निधी देऊन गती देणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

सांगली प्रतिनिधी – सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हा संविधान स्तंभ बनविण्यासाठी ५२५ किलो ब्राँझ मटेरियलचा वापर करण्यात आला असून स्तंभाच्या मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता घेण्यात आली आहे. संविधान स्तंभाची उंची ५ फूट तर असून व्यास अडीच फुटाचा आहे.  संविधान स्तंभ लोकार्पण समारंभास महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी संतोष रोकडे आदी मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS