राहाता ः येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये रयत शिक्षण संस्थेचे थोर संस्थापक डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साज
राहाता ः येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये रयत शिक्षण संस्थेचे थोर संस्थापक डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्तने राहाता शहरातून संकुलातील सर्व विद्यार्थ्यांनीं भव्य मिरवणूक काढली. शारदा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे, प्राचार्य विवेक गाडेकर,मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे, प्राचार्य निशा चेंगोट, उपप्राचार्य अशोक बोरसे यांच्या शुभहस्ते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली.
ढोल ताशांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीमध्ये सहभागी घेतला. कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा व सजावट या मिरवणुकीचे आकर्षण ठरले . विद्यार्थ्यांनीनी कलश ,लेझीम, टिपर्या पारंपारिक नृत्याच्या तालावर ठेका धरला .ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन लाठीकाठी नृत्य सादर केले या मिरवणुकी दरम्यान ग्रामस्थांनीही पाहण्याचा आनंद घेतला . .वीरभद्र मंदीर प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून. हुतात्मा चौकात मिरवणूक आल्यानंतर हुतात्मा स्मारकालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. नवनाथ मंदिरा मार्गे पुन्हा मिरवणूक शारदा शैक्षणिक संकुलात आली .रयत शिक्षण संस्थेमध्ये 22 सप्टेंबर हा दिवस आनंद उत्सव साजरा केला जातो संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांच्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था करण्यात आली .ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी पर्यवेक्षक देशमुख, प्रा.शरद गमे, प्रा. रमेश आहेर, ,विजय जेजुरकर ,,राजकुमार साळवे , आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS