नाशिक: महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयातील विद्युत भवन येथे आज शुक्रवारी (२६ डिसेंबर) गुरु गोविंदसिंह यांच्या शाहिद सुपुत्रांना वीर बाल दिनान
नाशिक: महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयातील विद्युत भवन येथे आज शुक्रवारी (२६ डिसेंबर) गुरु गोविंदसिंह यांच्या शाहिद सुपुत्रांना वीर बाल दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते चार साहीबजादे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर, वरिष्ठ व्यवस्थापक मुरलीधर गवळी, व्यवस्थापक हेमंत भामरे, उपकार्यकारी अभियंता दीपक गडलिंग, जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS