Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डीत पर्यावरणपुरक गणेशमूर्ती बनविणे कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

पाथर्डी प्रतिनिधी - आदि फौंडेशन आदिनाथनगर,श्री आनंद कॉलेज पाथर्डी व आनंद ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत शालेय विद्यार्थ्यांसाठी

नगर विकासासाठी महापालिका घेणार तीनशे कोटीचे कर्ज
घरगुती गॅस ग्राहकांनी त्वरीत ई-केवायसी करून घ्यावे
महालक्ष्मी’ हॉस्पिटलमधील आयसीयु सेंटरने मिळणार जीवदान : डॉ.तोरडमल

पाथर्डी प्रतिनिधी – आदि फौंडेशन आदिनाथनगर,श्री आनंद कॉलेज पाथर्डी व आनंद ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपुरक मातीच्या श्री गणेश मूर्ती बनविणे कार्यशाळेत शहरातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयातील सुमारे ४१८ विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन मोठा प्रतिसाद दिला. तर आमदार मोनिका राजळे यांनी या कार्यशाळेत सहभागी होऊन श्री गणेशाची मूर्ती बनवुन शालेय विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत त्यांना प्रेरणा दिली.

         शहरातील लोकनेते आप्पासाहेब राजळे बहुउद्देशीय सभागृहात कार्यशाळेचे उद्घाटन पाथर्डी शहरातील प्रसिध्द मूर्तीकार लक्ष्मीकांत बीडकर व रघुनाथजी पारखे यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी आमदार मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, जेष्ठ भाजपा नेते अशोक चोरमले, बंडू बोरूडे, श्री आनंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.शेषराव पवार, युवा नेते कृष्णा राजळे, बाजार समितीचे उपसभापती कुंडलिकराव आव्हाड, संचालक शेषराव कचरे,अजय रक्ताटे, नारायण पालवे,माजी नगरसेवक अनिल बोरुडे, बबन बुचकुल, नामदेव लबडे,संजय किर्तने,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, बबन सबलस,हरिभाऊ काटे, राजेंद्र साप्ते, यांच्यासह पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दोन दिवसीय कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी  १ ली ते ५ वी च्या वर्गातील मुलांचा  लहान गट  व दुसऱ्या दिवशी रविवार दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी ६ वी ते १२ वीच्या वर्गातील मुलांचा मोठा गट असे आयोजन केले आहे. आज लहान विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.आयोजकाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शाडूची माती देण्यात आली  त्यानंतर मूर्तीकार लक्ष्मीकांत बीडकर यांनी विद्यार्थ्यांना सुचना करत मूर्ती बनविण्याचे सांगितले सर्वच विद्यार्थ्यांनी सुचनाचे पालन करत सुंदर मुर्ती बनविल्या.

आमदार राजळे यांनीही कार्यशाळेत सहभागी होऊन स्वतः गणेश मूर्ती बनवुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला व प्रत्येक विद्यार्थ्यांजवळ जाऊन मूर्तीची पाहणी करत विचारपुस करून कौतुक केले. यानंतर विद्यार्थ्यांना आयोजकांच्या वतीने अल्पोपहार म्हणुन फळाचे वाटप करण्यात आले. दोन्ही गटातील आर्कषक व सुंदर मुर्ती बनविणाऱ्या विद्यार्थ्यांची परिक्षकांकडून  निवड केली जाणार असुन बक्षीस व स्मृतीचिन्ह दिले जाणार आहे. 

कार्यशाळा यशस्वीतेसाठी श्री आनंद कॉलेज चे प्राचार्य डॉ.शेषराव पवार, आमदार मोनिका राजळे यांचे स्वीय सहाय्यक सुरेश बाबर, आनंद ग्रीन क्लबचे समन्वयक प्रा.आनंद भोर्डे, आनंद ग्रीन क्लबचे मास्टर ट्रेनर सुर्यकांत काळोखे , कानिफ पाठक, अर्जुन नेहुल, मच्छिंद्र चोथे ,प्रा.राजीव सुरवसे यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.

COMMENTS