Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज तालुक्यातील येवता येथे बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त जय्यत तयारी

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील येवता येथे येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त जय्यत तयारी चालू आहे.दिनांक 6

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
भीषण अपघात; 2 कंटेनर दरीत कोसळले 
जागतिक आरोग्य संघटना आणि मानवी हीत!

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील येवता येथे येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त जय्यत तयारी चालू आहे.
दिनांक 6 जुलै 2023 रोजी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे यांचा वाढदिवस आहे या निमित्ताने येवता येथे दिनांक 5 जुलै 2023 रोजी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. केशव महाराज शास्त्री टाकळीकर यांच्या अमृततुल्य कीर्तनाचा कार्यक्रम आहे. केज तालुक्यातील व परिसरातील नागरिकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवहन या कार्यक्रमाचे आयोजक प्रदीप जोगदंड सर आणि बजरंग बप्पा मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे या ठिकाणी आयोजकांकडून वॉटरप्रूफ मंडप देण्याची जय्यत तयारी चालू असून येवता येथे बजरंग बप्पा सोनवणे मित्र मंडळाच्या व प्रदीप जोगदंड सर यांच्या वतीने विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान प्रदीप जोगदंड सर व बजरंग सोनवणे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS