Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील यांचे सहकारक्षेत्रासाठी मोठे योगदान : रामदास भोसले

                निघोज : सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील यांनी गावचा कारभार पन्नास वर्षापेक्षा जास्त करीत बिनविरोध निवडणूक करीत ग्रामपंचायत व स

कोपरगावात रंगणार विवेकभैय्या कोल्हे खुल्या बुद्धिबळ स्पर्धा
अहिल्यानगर : विद्येच्या मंदिरातच दहावीच्या विद्यार्थ्याचा खून
 छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू
Displaying IMG-20251127-WA0011.jpg

               

निघोज : सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील यांनी गावचा कारभार पन्नास वर्षापेक्षा जास्त करीत बिनविरोध निवडणूक करीत ग्रामपंचायत व सेवा सोसायटी माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले असल्याचे प्रतिपादन निघोज सोसायटीचे सचिव रामदास भोसले यांनी व्यक्त केले आहे. निघोज सोसायटी सभागृहात सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील यांची ३१ वे पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना सोसायटी पदाधिकारी व सभासद तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने अभिवादन करीत आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी भोसले बोलत होते. सोसायटीचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष वसंतराव ढवण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी डिजिटल चावडी या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मंगेश वराळ पाटील, कुकडीचे सेवानिवृत्त अधिकारी बाळासाहेब वराळ, शिक्षक किसनराव वरखडे, ज्ञानदेव ढवण, ग्रामपंचायत माजी सदस्य दगडू ढवण तसेच सभासद उपस्थित होते. भोसले यावेळी म्हणाले गेली ३१ वर्षांपासून कै. किसनराव वराळ पाटील यांनी केलेल्या विकासाभिमुख कामांची आठवण म्हणून सोसायटी माध्यमातून प्रत्येक पुण्यस्मरण दिनानिमित्त कै. भाऊंना आदरांजली वाहण्यात येते. भाऊंचे कार्य महान आहे. निघोज सारखे बारा वाड्यांचे मोठ्या लोकवस्तीचे गाव हा कारभार करणे एवढे सोपे नाही मात्र कै. भाऊ यांनी सोसायटी व ग्रामपंचायत सरपंच व चेअरमन पद वर्षानुवर्षे बिनविरोध करीत लोकाभिमुख कारभार करीत जुन्या काळात गावचा विकास केला ही बाब तालुक्याच्या जनतेच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सोसायटीचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष वसंतराव ढवण म्हणाले जुना काळ अत्यंत चांगला होता. सध्या मात्र निवडणुका बिनविरोध करणे शक्य होत नाहीत. सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पन्नास वर्षांपूर्वी जो संघटीतपणे गाव व पंचक्रोशीतील परिसराचा विकास केला तसा संघटीतपणे विकास करण्याची गरज आहे. कै. भाऊंचा नावलौकिक जिल्ह्यात होता. काम करणारा माणुस व सर्वसामान्य जनतेचा आधारवड म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. असा लोकाभिमुख पुढारी होणे शक्य नसल्याचे प्रतिपादन ढवण यांनी व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश वराळ पाटील यांनी केले शेवटी संतोष परांडे यांनी आभार मानले. दिवसभरात विविध संस्थाचे पदाधिकारी व सोसायटीचे पदाधिकारी यांनी सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

COMMENTS