Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धान्य वाटपाचे कमिशन लवकरच वर्ग केले जाईल – जयश्री माळी

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेला आश्‍वासन

अहमदनगर/प्रतिनिधी ः धान्य दुकानदारांनी पी एम धान्य योजनेचे वाटप केलेले कमिशन त्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग केले जाणार असुन यापुढील मोफत धान्य वाट

Ahmednagar : सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना शासकीय कामासंदर्भात अडचण भासू देणार नाही l LokNews24
देशसेवा व समाज कार्यात युवकांनी पुढाकार घ्यावा – हरिभाऊ डोळसे
काकडी विमानतळाच्या नाईट लँडिगचा प्रश्‍न सुटला

अहमदनगर/प्रतिनिधी ः धान्य दुकानदारांनी पी एम धान्य योजनेचे वाटप केलेले कमिशन त्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग केले जाणार असुन यापुढील मोफत धान्य वाटपाचेही कमिशन दुकानदारांच्या खात्यावर वर्ग केले जाईल असे आश्‍वासन जिल्हा पुरवठाअधिकारी जयश्री माळी यांनी दिले.               

जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडचणी संदर्भात अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्य वतीने निवेदन दिले त्या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा पुरवठा आधिकारी माळी यांनी वरील अश्‍वासन दिले या वेळी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी सांगितले की पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे धान्य दुकानदारांनी वाटप केले असुन त्याचे कमिशन तातडीने दुकानदारांच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात यावे माहे एप्रिल 2021  महीन्यात वाटप केलेल्या राज्य शासनाचे एक महीन्याचे पैसे ताताडीने  मिळावे जानेवारी 2023 पासुन मोफत धान्य वितरण करण्याचे शासनाचे आदेश असुन मोफत धान्य वाटपामुळे दुकानदार आर्थिक विवंचनेत सापडला आहे दुकान भाडे विज बिल मापाडी यांचा खर्च कसा भागवावा याचे संकट दुकानदारापुढे उभे आहे त्यामुळे मोफत वाटपाचे कमिशन दर महा खात्यावर जमा व्हावे  माहे आँक्टोंबर नोव्हेंबर  डिसेंबर या महीन्याकरीता दुकानदारांनी चलन भरले असुन पैसे भरुन दुकानदारांना ते धान्य उशिरा जानेवारी महिन्यात मिळाल्यामुळे त्याचे वितरण मोफत करावे लागले त्यामुळे ते चलनाचे भरलेले पैसे विनाविलंब मिळावे दुकानदारांना धान्य दुकानात मोजुन मिळावे त्या करीता प्रत्येक गाडीत वजनकाटा असावा आदि मागण्याचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांना देण्यात आले त्या वेळी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  जिल्हा सचिव रज्जाक पठाण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे श्रीरामपुर तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले उपस्थित होते.

COMMENTS