Homeताज्या बातम्यासंपादकीय

ग्राॅक : जगाची उध्वस्ती की उन्नती ?

   एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वोच्च घडामोडी असणारे शतक राहील, याची जाणीव भारतीय सत्ताधाऱ्यांना ८० च्या दशकात झाली होती. त्याम

ओबीसींना सेवक ठरवणारे शर्मा, बिंद्रा सामाजिक गुन्हेगारच !
गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा अपरिहार्यच!
मनाचा कोपरा आणि कोपऱ्यातील कचरा!

   एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वोच्च घडामोडी असणारे शतक राहील, याची जाणीव भारतीय सत्ताधाऱ्यांना ८० च्या दशकात झाली होती. त्यामुळे, संगणक युगाला त्याच काळात प्रारंभ झाला होता. आता जग पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या प्रकारात प्रवेश करते झाले आहे. चॅटबोट नावाचा एआय सर्वात प्रथम बाजारपेठेत आला किंवा समाज माध्यमांमध्ये आला. त्याचा उपयोग करतानाच काही इतर चॅटबोटचे प्रकारही मार्केटमध्ये आले. पण, त्या सर्वांपेक्षा चर्चा झाली, चीनने आणलेल्या डिप फेक या चॅटबोटची. कारण, हे अतिशय आधुनिक आणि सर्वात स्वस्त अशा चीप मध्ये बनवलेलं चॅटबोट. मात्र, डीप फेक ची चर्चा संपते न संपते तोच, एलान मस्क यांनी आणलेलं चॅटबोट म्हणजे ग्राॅक याने तर अख्या विश्वालाच आपल्या कवेत घेतल्याचे दिसते आहे. कोणताही प्रश्न विचारला तरी ग्राॅक हे चॅटबोट त्याला अतिशय तात्काळ उत्तर देत आहे.  केवळ तात्काळच उत्तर देत नाही, तर मानवी भावना आणि संवेदनांचही प्रदर्शन करते.  ग्राॅक नावाचं हे चॅटबोट करत आहे. अर्थात, सुरुवातीच्या काळात एलान मस्क यांनी एआय,  अर्थात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला विरोध केला होता. त्यांचं म्हणणं होतं की, हा प्रकार जगाला उध्वस्त करू शकेल. परंतु, नाही-नाही म्हणत त्यांनी अचानक त्यांचं ग्राॅक नावाचं चॅटबोट बाजारात आणून, सर्व प्रकारच्या चॅटबोट पेक्षा आपण किती आघाडीवर आहोत, हे दाखवून देत, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील मक्तेदारी त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केली. आज पहाटे हा लेख वाचत असतानाच, त्यांच्याच स्पेसएयर वरून गेली नऊ महिने अवकाशात अडकलेल्या सुनिता विल्यम्स आणि विल्मर बुच या दोन अवकाश वीरांना देखील पृथ्वीवर आणण्याचे श्रेय, हे एलान मस्क यांचे आहे. जगाने आधुनिक काळात एआय सारख्या क्षेत्रांमध्ये नुसता प्रवेश केला नाही, तर, त्याच्या सर्वोत्तम गुणवत्तेकडे जगाला नेलेले आहे. येणाऱ्या काळात या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जागतिक समाजावर नेमका काय परिणाम होतो, या संदर्भात जगामध्ये जी चर्चा होते आहे, त्याच्यातून अजूनही कोणता निष्कर्ष निघालेला नाही. अर्थात, न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या  अनुषंगाने जगामध्ये चर्चा होत असते. ही चर्चा दुहेरी पध्दतीने होते. काहींचं म्हणणं आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी मानवी श्रमाची उपयुक्तताच नष्ट करणारी आणि त्याचबरोबर मानवी बुद्धिमत्तेलही आव्हान ठरलेल्या एआय चॅटबोट हे क्षेत्र मानवी समाजाला मागे नेते की पुढे नेते, हे बघावं लागेल. अर्थात, मानवी समाज इतका पुढे गेला आहे की, तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला निर्माण करून, त्याने मानवी बुद्धिमत्तेलाच आव्हाण दिलेले आहे. त्यामुळे, एकाच प्रकारात हजारो लोकांचं कार्य जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स करत असेल, तर, जगातील अनेक बुद्धिमत्तांनाही घरी बसावं लागेल का? हा प्रश्न प्रामुख्याने निर्माण झालेला आहे. कोरोना काळापासूनच जगात सुरू झालेली चर्चा न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या दिशेने जाणार जग, हे मानवी लोकसंख्या कमी करण्याच्या दिशेने उचललेलं जाणीवपूर्वक पाऊल होतं, असा संशय जो जगाने घेतला, तो आता बळावतो आहे. परंतु, याच्यात वास्तव किती आहे, हे  येणारा काळ सांगेल. अर्थात, कोणतेही तंत्रज्ञान हे भारतातील बहुजन समाजासाठी उपयुक्त साधन बनले आहे. कारण, तंत्रज्ञानामुळे बहुजन समाजाच्या आवाक्यात अनेक गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे एआय सारखे तंत्रज्ञान देखील बहुजन समाजाला अधिक सक्षम करणारे टूल आहे, ही खात्री आपण मनाशी बाळगली पाहिजे.

COMMENTS