Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील चार खेळाडूंना सरकारी नोकरी

पुणे / प्रतिनिधी : विविध खेळांतून महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून देत राज्याची मान उंचविणार्‍या 95 आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंना कोणतीही पर

भक्ताडाला हौस असेल, तर, होऊन जाऊ द्या चौकशी, भुजबळांची अन् आमचीही ! 
या अधिवेशनात नवा विधानसभा अध्यक्ष मिळेल, तोही काँग्रेसचा बाळासाहेब थोरातांचा दावा | LOKNews24
तेजस्विनी लोणारीला निरोप देताना ढसाढसा रडले सदस्य

पुणे / प्रतिनिधी : विविध खेळांतून महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून देत राज्याची मान उंचविणार्‍या 95 आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंना कोणतीही परीक्षा आणि कोणत्याही मुलाखतीशिवाय राज्य शासनाने थेट नियुक्ती देत सरकारी नोकरी दिली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंना महाराष्ट्र शासनाची नोकरी प्राप्त झाली आहे. यात आंबेगाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील कन्या काजल भोर हिचाही समावेश आहे.

या 95 खेळाडूंमध्ये खो-खोमधील जवळपास 30 खेळाडूंचा समावेश आहे. यात काजल भोर हिच्यासह सुयश गरगटे, मिलिंद कुरपे व प्रियांका इंगळे या चार खो-खो खेळाडूंना समावेश असून त्यांच्या नियुक्तीसाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. काजल भोर ही रांजणी (ता. आंबेगाव) येथील नरसिंह क्रीडा मंडळाची खेळाडू व सदस्य आहे.

राज्य शासनाच्या अतिउच्च गुणवत्ता धारक खेळाडूंच्या थेट नियुक्तीच्या आदेशानुसार तिची पुण्यातील बालेवाडी येथे राज्य शासनाच्या क्रीडा विभागात नियुक्ती झाली. ती 18 राष्ट्रीय स्पर्धा खेळली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दक्षिण आशियायी खो-खो स्पर्धेत महिला संघाकडून खेळताना तिने सुवर्ण पदक पटकावले आहे. तसेच प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा नॅशनल गेम्स गोवा येथे महाराष्ट्र महिला संघातून खेळताना तिने सुवर्ण पदक पटकाविले आहे.

COMMENTS