मुंबई : राज्यातील शासकीय तसेच इतर पात्र कर्मचार्यांसाठी महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. जुलै 2025 पासून लाग
मुंबई : राज्यातील शासकीय तसेच इतर पात्र कर्मचार्यांसाठी महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. जुलै 2025 पासून लागू होणार्या या निर्णयामुळे महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याची माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी तिसरा दिवस होता. यापूर्वी दुसर्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण झाले. या अभिभाषणावर चर्चा करताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यपालांनी सरकारच्या भूमिकेचे समर्थन करताना वास्तवापेक्षा वेगळी माहिती मांडल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, मंगळवारी विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन केले होते. मात्र, आज कोणतेही आंदोलन झाले नाही. तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2026 विधानसभा पटलावर मांडण्यात आले आणि ते बहुमताने मंजूर झाले. या वेळी राजू खरे यांनी तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

COMMENTS