Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुष्काळाप्रती सरकारची अनास्था

खासदार शरद पवार यांची टीका

मुंबई ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून, मराठवाड्यातील बैठकीला केवळ दोन पालकमंत्री उपस्थित होते, तीन

शरद पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी
भाजपकडून देशात सत्तेचा गैरवापर ः खा. शरद पवार
कांदा निर्यातबंदी दिल्लीश्‍वरांना उठवावीच लागेल

मुंबई ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून, मराठवाड्यातील बैठकीला केवळ दोन पालकमंत्री उपस्थित होते, तीन पालकमंत्री अनुपस्थित होते, त्यामुळ दुष्काळाप्रती सरकारची अनास्था दिसून येत असल्याची टीका खासदार शरद पवार यांनी केली. शरद पवारांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, राज्यामध्ये सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. पाणीटंचाई आणि चार्‍याचा प्रश्‍न गंभीर आहे. यावर मराठवाड्यावर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. मात्र सरकारमधील मंत्रीच या बैठकीला अनुपस्थित राहतात, यावरून सरकारची दुष्काळाप्रतीची अनास्था दिसून येत आहे. सरकारने तात्काळ दुष्काळ निवारण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन देखील शरद पवारांनी या पत्रकार पषिदेत केले. शरद पवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला पाचपैकी दोनच मंत्री येत असतील तर याची नोंद त्यांनी घेण्याची गरज आहे. कृषीमंत्री पद महत्वाचे असून, यापदावर असणारे मंत्री देखील अनुपस्थित होते, याबद्दल बोलतांना शरद पवार म्हणाले, कृषि मंत्र्यांच्या जिल्हात दुष्काळाच्या बाबतीत अधिक गंभीर परिस्थिती असतांना बैठकीला तेही हजर राहिले नसतील तर हे आणखी चिंताजनक आहे. दुष्काळाच्या परिस्थितीकडे कृषि मंत्री कोणत्या नजरेने पाहतात, याचे हे उदाहरण आहे. मला या घटनेचे राजकारण करायचे नाही. पण मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पाहावे आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या अनुपस्थितीची नोंद घ्यावी, असेही पवार यांनी म्हटले आहे. दुष्काळी परिस्थिती हाताळायची असेल तर, आचारसंहिता शिथील करावीच लागेल. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे. प्रत्येक जिल्ह्यात 700 ते हजार हेक्टरपर्यंत हे नुकसान मर्यादीत आहे. पण नुकसान हे नुकसानच असते. विशेषतः फळबागांना झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणांवर असते, त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन वेळीच मदत करण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे.  

सरकारला जागे करण्याचा प्रयत्न – राज्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती असतांना सरकारकडून त्याला प्रतिसाद दिला जात नाही. त्यासाठी आम्हाला आवाज उचलावा लागत आहे. माध्यमांच्यामार्फत आम्ही सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत, एवढे करूनही जर सरकार जागे होणार नसतील तर आमच्याकडे इतर मार्ग आहेत. जून महिन्यात कोकणातला काही भाग वगळला तर महाराष्ट्रातील उर्वरित भागात पाऊस म्हणावा तसा पडणार नाही. त्यामुळे दुष्काळासंबंधीची उपाययोजना तातडीने केली पाहीजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

शरद पवार सध्या नकारात्मक मानसिकतेत ः फडणवीस – खासदार शरद पवारांनी सरकारला दुष्काळ प्रश्‍नांवर घेरल्यानंतर आता भाजपकडून शरद पवारांना लक्ष्य करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार आणि महाविकास आघाडी सध्या नकारात्मक मानसिकतेत आहेत, त्यामुळे त्या अंगाने त्यांची टिप्पणी आहे. दुष्काळात निवडणूक सुरू असतानाही प्रशासनाने त्यांच्या जबाबदार्‍या नीटपणे पार पाडल्या आहेत. दुष्काळी भागात टँकर पुरवणापासून ते इतर अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. अजूनही महिनाभर या उपाययोजना सुरु राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

COMMENTS