Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत निवृत्तीनाथ मंदिरासाठी शासनाचा निधी उपलब्ध करून देणार -पालक मंत्री दादा भुसे यांचे आश्वासन

त्र्यंबकेश्वर - संत निवृत्तीनाथांच्या मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी ये

भाजपचा विजय झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा | LOK News 24
राज्यमंत्री तनपुरेंसह मनपा आयुक्तांना खंडपीठाची नोटीस ; मनपा अभियंत्याला पाठीशी घालणे भोवणार?, 16 जुलैला सुनावणी
निवडणूक : लोकशाहीची की भांडवलशाहीची?

त्र्यंबकेश्वर – संत निवृत्तीनाथांच्या मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे  दिले श्री संत निवृत्तीनाथ समाधीची यात्रा शासकीय महापूजा आज पौषवारी एकादशीला पहाटे झाली.  पालकमंत्री दादा भुसे यांच्या शुभ हस्ते महापूजा झाली.

लवकरच त्र्यंबकेश्वर मध्ये येवून  कुंभमेळ्याची बैठक घेणार आहे. आराखडा तयार करा असे मंत्री म्हणाले. यंदा पाऊस कमी झाला आहे असे  प्रारंभी सांगत देवाचा धावा केला. यंदा जास्त दिंडी आणि जास्त वारकरी आल्याचेही पालकमंत्री म्हणाले. मध्यरात्री श्री संत निवृत्तीनाथ मंदिर कडून ट्रस्ट कडून शोडपचार महापूजा झाली. या महापूजेत विश्वस्त सामील होते. दोन्ही पूजेचे पौरोहित्य मंदिराचे वंशंपरा पुजारी गोसावी बंधू यांनी केले. पूजेनंतर स्वागत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थान ट्रस्ट कडून पालकमंत्री दादा भुसे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संत निवृत्तीनाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे यांनी येत्या कुंभमेळ्यापूर्वी नाशिक त्रंबक रस्ता दिंडी मार्ग करावा अशी मागणी केली.

सभा मंडपासाठी आणि मंदिर परिसरासाठी राज्य शासनाचा निधी द्यावा अशी मागणी ट्रस्ट कडून करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावातच एकनाथ आहे. मुख्यमंत्र्यांप्रमाणे पालकमंत्री वारकऱ्यांबद्दल आदर ठेवून आहे. हे काल रात्री दिंड्यातून फिरताना समजले त्यामुळे ही राम-लक्ष्मणाची जोडी आहे . वारकऱ्यांचे मुख्यमंत्री आहे असे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आध्यात्मिक आघाडीचे राज्यध्यक्ष अक्षय महाराज भोसले म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन बैठक घेतली. तसेच वारी नियोजनासाठी दरवर्षी निधी उपलब्ध करून देण्याच्या आश्वासन दिले त्रास कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानण्यात आले.

ट्रस्ट पाठपुराव्याला यश मिळाल्याचा दावा करण्यात आला. सूत्रसंचालन नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी केले. प्रास्ताविक नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी केले. नगरपालिकेकडूनही मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. वारकरी महामंडळाचे अध्यक्ष रामेश्वर शास्त्री मुक्ताई संस्थान भैय्यासाहेब महाराज पाटील तहसीलदार  श्वेता संचेती, शिवसेनेचे पदाधिकारी रवींद्र भोये उपस्थित होते.वाडा येथील भाविकांनी तीन लाखाची देणगी दिली त्याचा  तसेच रांगेतील पहिल्या भाविकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मंदिराचे सचिव सोमनाथ घोटेकर, राहुल साळुंखे, अमर ठोंबरे, कांचनताई जगताप, भानुदास गोसावी ,जयंत गोसावी ,योगेश गोसावी नारायण मुठाळ माधव राठी हे तसेच त्रंबकेश्वर नगरपालिकेचा अधिकारी वर्ग, तसेच विविध कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी हजर होते.उपस्थित होते. महापूजेला यावेळी पहाटे  खा हेमंत गोडसे हिरामण खोसकर हे उपस्थित राहू शकले नाही. दरम्यान यंदा यात्रेला गर्दी वाढली आहे दिंड्या वाढल्या आहे अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळाली. साडेतीन लाख भाविकांचा आले असाअंदाज आहे संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात चौख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

COMMENTS