Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुन्या पेन्शनसाठी शासकीय रुग्णालयातील कर्मचारी संपावर  

रुग्णालयातील 23 शस्त्रक्रिया ढकलल्या पुढे

सोलापूर प्रतिनिधी - जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. आरोग्य कर्मचारी आज ही आपल्या मागण्यावर ठाम असून संपामुळे आरोग्य

लोकशाहीसमोरील आव्हाने…
साई रिसॉर्ट प्रकरणी ‘ईडी’कडून आरोपपत्र दाखल
लखनऊमध्ये भिंत कोसळून 9 मजुरांचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी – जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. आरोग्य कर्मचारी आज ही आपल्या मागण्यावर ठाम असून संपामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात केवळ सोलापूरच नाही तर उस्मानाबाद, लातूर शिवाय कर्नाटकातून देखील रुग्ण मोठ्या संख्येने येतात. आज सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील 350 स्टाफ नर्स, 110 मामा-मावशी, 110 क्लार्क आणि शिपाई संपात सहभागी झाले आहेत. आम्ही कालपासून कामकाजावर बंदी घातली त्यामुळे रुग्णालयातील 23 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत अशी माहिती संपकरी नर्सेसनी दिली आहे. दरम्यान, रुग्णांचे जे काही बरे वाईट होईल त्याला प्रशासन आणि शासन जबाबदार असेल असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला आहे. कोविड काळात केवळ परिचारिका सेवा देत होत्या. त्यावेळी आम्हाला वाढीव भत्ता देण्याचे आश्वासन दिले मात्र भत्ता ही दिला गेला नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत कामावर हजर होणार नाही अशी भूमिका घेतली आहे. सोलापूर शासकीय रुग्णालयातील जवळपास बाराशे कर्मचारी कालपासून संपात सहभागी आहोत. व्हीलचेअर, स्ट्रेचर ढकलण्यापासून सर्व काम रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागत आहेत. दुसऱ्या दिवशी शासकीय रुग्णलयात एकत्रित येऊन शासन विरोधात घोषणाबाजी करत आहेत.

COMMENTS