Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यव्यापी संपावर उद्या सरकारी कर्मचार्‍यांची बैठक

अहमदनगर ः जुनी पेन्शन व इतर 17 प्रलंबीत मागण्यांसाठी 14 डिसेंबर पासून पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती

जिल्हा परिषदेतील मुलांना निकृष्ट दर्जाचे गणवेश
डॉ. रामकृष्ण जगताप यांची ’श्रीरामपूर साहित्य परिषद ’अध्यक्षपदी निवड
प्रवासी भाडे सवलतीसाठी दिले बनावट प्रमाणपत्र : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर ः जुनी पेन्शन व इतर 17 प्रलंबीत मागण्यांसाठी 14 डिसेंबर पासून पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य अहमदनगर शाखेच्या वतीने बुधवारी (दि.22 नोव्हेंबर) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत राज्याचे सरचिटणीस विश्‍वास काटकर व प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र सरतापे हे विविध मागण्या व संपाच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत. मध्यवर्ती संघटनेचे राज्य पदाधिकारी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून, बुधवारी सकाळी 10 वाजता पाटबंधारे कार्यालयातील मध्यवर्ती संघटनेच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. यामध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद आणि समन्वय समितीच्या सर्व पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे व राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केले आहे.

COMMENTS