Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोपीचंद पडळकरांचे वक्तव्य अशोभनीय ः फडणवीस

तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे

मुंबई/प्रतिनिधी ः आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य अशोभनीय असून, अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे असून, तिन्ही पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्

फडणवीसांचं वय पाहू नका… १०० अजित पवार ते खिशात घालून फिरतात…
आमदार शिंदेंसाठी मी बेरर चेक ः फडणवीस
Nawab Malik Live: अंडरवर्ल्डशी संबंध? मलिक म्हणतात ‘आ रहा हूँ मै’ | (Full Video)

मुंबई/प्रतिनिधी ः आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य अशोभनीय असून, अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे असून, तिन्ही पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांचा आदर आणि सन्मान ठेवला पाहिजे, आणि अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये, असे माझे स्पष्ट मत आहे, असे मत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, लोकशाहीत महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. महिलांना वाव मिळाला पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आभार मानत आहोत. सर्व जण याला पाठिंबा देतील कुणी याला विरोध करणार नाही, असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावना आमच्याबद्दल स्वच्छ नाही. त्यामुळे त्यांना पत्र देण्याची गरज नाही. लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू आहे ते. त्यामुळे त्यांना आम्ही मानत नाही. म्हणून आम्ही त्यांना पत्र दिले नाही आणि या पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्या दोघांना मी पत्र दिले आहे, असे पडळकर म्हणाले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांवर जहरी टीका केली. यामुळे भाजप आणि अजित पवार गट यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून आंदोलन करण्यात आले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याच्या विरोधात नाशिक शहर व जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने निषेध व्यक्त करत पडळकरांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. आमदार पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत निषेध व्यक्त केला.

COMMENTS