Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कुल  येथे गोपालकाला  उत्साहात

 मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल जाधव संकुल येथे गोकुळाष्टमी अर्थात श्रीकृष्ण जयंतीचा सोहळा,

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा शाळेची यशस्वीतेची परंपरा कायम
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल जाधव च्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल जाधव संकुल विद्यार्थांचे पिंचाक सिलेक्ट  मध्ये व घवघवीत यश

 मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल जाधव संकुल येथे गोकुळाष्टमी अर्थात श्रीकृष्ण जयंतीचा सोहळा, जन्माष्टमी गोपाळकाला साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक  प्रकाश सुखदेव कोल्हे ,संस्थेच्या सचिव  ज्योती कोल्हे  समन्वयिका  सुरेखा आवारे  तसेच शाळेचे मुख्याध्यापिका  उमादेवी विश्वकर्मा  आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व कृष्णमुर्तीचे पूजन करण्यात आले तसेच प्रकाश कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

गोपाळकाला म्हणजे -गोपाळ यांचा मेळा अध्यात्माचा भावपूर्ण रस तसेच सामाजिक ऐक्य व व्यवस्थापकीय कौशल्य दाखविणारा आणि यशाच्या उंच शिखरावर जाण्यासाठी खालचा पाया भक्कम उभारणारे आधारस्तंभ आवश्यक असतात अशी उदात्त शिकवण देणारा हा सण विविध पद्धतीने रूढी परंपरा जपत संपूर्ण भारतात हा सण मोठ्या जल्लोषात

 आणि उत्साहात दरवर्षी साजरा होतो. अशा या लाडक्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल जाधव संकुल मधील बाल गोपाळांनी मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला. कोणी कृष्ण होतो, कोणी राधा तर कोणी गोपीका, छोटी हंडी उभारून  विद्यार्थ्यांना दहीहंडीचा खेळ आनंदाने खेळला व बालगोपालांच्या हातून हांडी फोडून दहीहंडीचा सण आनंदात साजरा केला.

COMMENTS