Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भागुजीराव ढेकळे विद्यालयाला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सदिच्छा भेट

गेवराई प्रतिनिधी - तालुक्यातील एकलिंगेश्वर मंदिर पाडळसिंगी येथे दुसर्या श्रावणी सोमवार निमित्त माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दर्शन घेतले त्य

गौतमीच्या कार्यक्रमात तरुणाचा राडा
अखेर निवडक औषधांवरील आयात शुल्क रद्द
पोलिस ठाणे आणि न्यायालयाच्याआवारातूनच दुचाकीची चोरी

गेवराई प्रतिनिधी – तालुक्यातील एकलिंगेश्वर मंदिर पाडळसिंगी येथे दुसर्या श्रावणी सोमवार निमित्त माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दर्शन घेतले त्यानंतर भागुजीराव ढेकळे विद्यालयाला सदिच्छा भेट दिली.
सोमवार दि.28 रोजी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दुसर्या श्रावणी सोमवार निमित्त पाडळसिंगी येथील एकलिंगेश्वराचे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर आदर्श शिक्षण संस्थेच्या कृषि पंडीत भागुजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक थिटे ए.एस.यांनी शाळेत संपन्न झालेल्या विविध स्पर्धा, विविध परिक्षा आणि अध्यापनाविषयी सविस्तर माहिती देऊन शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला, त्यानंतर शाळेच्या कामकाजाविषयी आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी गावातील प्रतिष्ठीत नागरिक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS