Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीएसएनलच्या कार्यालयातून 3 लाखाचा माल चोरीला

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी येथील बीएसएनएलच्या कार्यालयातून मोबाईलचे बीटीएस आदि सुमारे 3 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उ

इनरव्हील क्लबकडून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
अजित पवारांनी नगरला येऊन काय केले ? गडकरींनाच फोन केला ना ?
धावपळीच्या युगामध्ये मैदानी खेळ महत्त्वाचे ः सुधाकर वक्ते

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी येथील बीएसएनएलच्या कार्यालयातून मोबाईलचे बीटीएस आदि सुमारे 3 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सुनील सोनवणे, वय 33 वर्षे, रा. सावेडी, ता. जि. अहमदनगर, हल्ली रा. मल्हारवाडी रोड, ता. राहुरी, जि.अहमदनगर हे राहुरी येथील बीएसएनएल कार्यालयात टेक्निशयन म्हणुन नोकरीस आहे. त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील बीएसएनएल टॉवर जवळील नवीन फोर जी मोबाईलचे बीटीएस बसवले होते.अज्ञात भामट्याने त्या ठिकाणी बसवलेले नवीन फोर जी मोबाईल बीटीएस चे बीबीयु व एलसीसी कार्ड असा एकूण 3 लाख 38 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.  सागर सुनिल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. 348/2024 भादंवि कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS