काँग्रेसच्या ’भारत जोडो यात्रे’ला चांगला प्रतिसाद : नाना पटोले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसच्या ’भारत जोडो यात्रे’ला चांगला प्रतिसाद : नाना पटोले

मुंबई : देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली असून या यात्रे

अवैध विक्री होणाऱ्या गुटख्यावर प्रतिबंधासाठी विशेष मोहिम राबवा:पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
बिग बॉस फेम अभिनेत्रीची पोलिसांत धाव
राजकीय नेत्याचा महिलेसोबतचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल.

मुंबई : देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली असून या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष बिथरला आहे. राहुल गांधी यांच्या टीशर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागत असून यातूनच ’भारत जोडो यात्रे’मुळे भाजपला धडकी भरली आहे, हे सिद्ध होत आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. भारतीय जनता पक्षाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस संपली, राहुल गांधी यांना भाजपा महत्व देत नाही असे म्हणणारे भाजपाचे डझनभर नेते, प्रवक्ते, मंत्री राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी व त्यांची बदनामी करण्यासाठी अहोरात्र झटत असताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु करताच भाजपाच्या नेत्यांची कोल्हेकुई सुरु झाली कारण या यात्रेला जनतेचाच प्रतिसाद मिळत आहे. जनतेचे प्रश्‍न घेऊन त्यांच्याशी संवाद साधत राहुल गांधी देश पिंजून काढत आहेत. 150 दिवस 3500 किमीचा प्रवास व 12 राज्यातून ही यात्रा जाणार आहे. सुरुवातीलाच भाजपाला भारत जोड़ो यात्रेची इतकी भिती वाटू लागली आहे. यात्रा जसजशी पुढे जाईल तसा मिळणारा प्रतिसाद भाजपाचे डोळे दिपवणारा असेल. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्‍नावर राहुलजी थेट केंद्र सरकारला जाब विचारत असून जनतेचे हे प्रश्‍नच महत्वाचे आहेत हे लोकांच्या प्रतिसादावरून दिसून येते.

COMMENTS