Gold performance of Atma Malik in Kho-Kho National Tournament कोपरगाव प्रतिनिधी : 14 वर्ष वयोगटातील 67 व्या राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धा रां
कोपरगाव प्रतिनिधी : 14 वर्ष वयोगटातील 67 व्या राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धा रांची झारखंड येथे 01 ते 05 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न झाली. स्पर्धेचा अंतिम सामना महाराष्ट्र विरुध्द उत्तरप्रदेश या संघामध्ये झाली. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात महाराश्टऊ संघाने बाजी मारत सुवर्ण पदकावर आपले नावे कोरले. यामध्ये आत्मा मालिकच्या खेळाडुंनी मोलाची कामगिरी बजावली. महाराष्ट्राच्या विजेत्या संघात आत्मा मालिकच्या आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुलाचे जितेंद्र वळवी व उमेष वळवी हे दोन खेळाडू होते. या विद्यार्थ्याचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ते म्हणाले की, या खेळाडूंना शालेय राष्ट्रीय स्तराचे सुवर्ण पदक मिळाले हे आत्मा मालिकसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हे दोन्हीही विद्यार्थी नंदुरबार जिल्हयातील असून इयत्ता पहिलीपासून आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्याचे पालक मोलमजुरीचे काम करतात. शासनाच्या नामांकित योजनेतून हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यामध्ये मुळातच चपळता, काटकता, ध्येयप्रती पूर्ण निश्ठेने काम करण्याची तळमळ असतेच म्हणूनच तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरातील स्पर्धेकरीता या विद्याथ्र्यांनी दिपावलीची सुट्टी न घेता संकुलात राहुन सरावामध्ये सातत्य ठेवले. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये आत्मा मालिकच्या एकूण 94 विद्यार्थ्यानी राष्ट्रीय स्तरावरील खेळामध्ये राज्याचे प्रतिनिधीत्व केले. आत्मा मालिकमध्ये असणारे 42 क्रीडा प्रशिक्षक 40 खेळांचे प्रषिक्षण व प्रशिक्षणाची जुन महिन्यापासूनचे केले जाणारे कालबध्द नियोजन यामुळेच हे यश प्राप्त झाले असे यावेळी त्यांनी सांगितले. क्रीडा व्यवस्थापक साईनाथ वर्पे म्हटले की, जितेंद्र वळवी व उमेश वळवी हे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात इयत्ता पहिलीपासून शिक्षण घेत आहे. हे दोन्हीही विद्यार्थी आदिवासी भागातील असून अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करुन त्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे. हे विद्यार्थी भविष्यात मोठे खेळाडू होतील याचा विश्वास असून संकुलातील विद्याथ्र्यांना या सुवर्ण पदकाच्या कमाईमुळे प्रेरणा मिळाली आहे असे यावेळी म्हटले. या दोन्ही खेळाडूंना खो-खो प्रशिक्षक रविंद्र नेंद्र, गणेश म्हस्के, आण्णासाहेब गोपाळे, अर्जून खेकडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे प.पू.आत्मा मालिक माउली, संतगण, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, प्राचार्य माणिक जाधव, निरंजन डांगे, नामदेव डांगे, संदिप गायकवाड, वसतिगृह व क्रीडा व्यवस्थापक साईनाथ वर्पे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, लेखा व्यवस्थापक गोपाल कुलकर्णी आदिंनी अभिनंदन केले.
COMMENTS