Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत फ्री पिस्टल 50 मीटरमध्ये भारताला सुवर्णपदक

टीममध्ये इस्लामपूरच्या (जि. सांगली) साक्षी अनिल सूर्यवंशीचे योगदान

इस्लामपूर / प्रतिनिधी : बाकू इथं सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत इस्लामपूरच्या (जि. सांगली) साक्षी अनिल सूर्यवंशीच्या टीमने सुवर्णपदक प

बिअर फुकट दिली नाही म्हणून बार मॅनेजरला बेदाम मारहाण करत तोडफोड | LOKNews24
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील सर्व निवडणुका महाडिकांसोबत लढणार : वैभव नायकवडी
नगर जिल्हा अध्यात्माची भूमी – पालकमंत्री विखे

इस्लामपूर / प्रतिनिधी : बाकू इथं सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत इस्लामपूरच्या (जि. सांगली) साक्षी अनिल सूर्यवंशीच्या टीमने सुवर्णपदक पटकावले आहे. फ्री पिस्टल 50 मीटर इव्हेंट या प्रकारात हे यश मिळाले आहे. तिच्या टीममध्ये टियाना आणि करणदीप कौर या सहकार्‍यांचा समावेश आहे. साक्षी आणि तिच्या सहकार्‍यांमुळे महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले असून इस्लामपूर शहराच्या लौकिकातही भर पडली आहे.
साक्षी ही इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून सध्या बीसीएच्या दुसर्‍या वर्गात शिकत आहे. राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेमधून तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली निवड तिनं सार्थ ठरवून दाखवली आहे. साक्षी ही साखराळे (ता. वाळवा) गावची आहे. गेली दोन वर्षे ती या स्पर्धेचे ध्येय बाळगून तयारी करत होती. जेमतेम आर्थिक परिस्थिती असतानाही केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने मेहनतीने हे यश मिळवले आहे. साऊथ एशियन मेडलिस्ट असलेले जितेंद्र विभूते हे तिचे प्रशिक्षक आहेत. आई ब्युटी पार्लर चालवत शिवणकाम करते. वडील वाहन व्यवसायात आहेत. तिला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असताना आर्थिक अडचण निर्माण झाली होती. त्यासाठी कुटुंबियांना कर्ज काढावे लागले. याशिवाय तिच्या या वाटचालीत वाळवा शिक्षण संस्थेचे सहसचिव अ‍ॅड. धैर्यशील पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, तत्कालीन प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार प्रदीप उबाळे, अजय शिंदे, उद्योजक सतीश सूर्यवंशी, वर्षाराणी तोडकर, सांगली जिल्हा रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित आंदळकर, ममता आंदळकर, शूटर नईम नरंदेकर यांचे सहकार्य लाभले.

COMMENTS