Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तासवडे टोल नाक्यावर 7 कोटी 53 लाखाचे सोन्या-चांदीचे दागिणे जप्त

कराड / प्रतिनिधी : विधानसभेच्या निवडणूकांची आचार संहिता लागू झाल्यापासून तपासणीचे नाके सक्रिय झालेले पहायला मिळत आहेत. दि. 27 ऑक्टोंबर रोजी साय

इस्लामपूरात वाहतुकीस अडथळा करणारे धोकादायक विजेचे खांब हटवण्यास प्रारंभ
18 वी आंतर जिल्हा मैदानी अजिंक्यपद निवड स्पर्धा उत्साहात
पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत-जास्त झाडे लावावीत : ना. रामराजे नाईक-निंबाळकर

कराड / प्रतिनिधी : विधानसभेच्या निवडणूकांची आचार संहिता लागू झाल्यापासून तपासणीचे नाके सक्रिय झालेले पहायला मिळत आहेत. दि. 27 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता संशयास्पत रित आढळून आलेल्या कुरिअर कंपनीच्या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीत 9 किला 390 ग्रॅम सोेने व 60 किलो चांदी असा एकूण 7 कोटी 53 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा मुद्देमालाची तपासणी करण्याचे काम सुरु असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कराड-सातारा जाणार्‍या रस्त्यावरील तासवडे टोल नाक्यावर एमएच 12 व्हीएफ 3937 क्रमांकाची कुरिअर वाहतूक करणारी गाडी अडवण्यात आली. वाहनाच्या इनव्हाईसची तपासणी केल्यावर त्यात सोन्या-चांदीचे दागिने असल्याचे आढळले. या वस्तू इनव्हाईस प्रमाणे आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी ही गाडी तळबीड पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही निगराणीखाली सुरक्षित ठेवण्यात आली. ज्यामध्ये विविध तपासणी पथकांचे सहकार्य घेण्यात आले.
ही कारवाई एमएसटी पथक, जीएसटी अधिकारी, आयकर अधिकारी, कराड तहसीलदार आणि कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आली. तपासणीमध्ये 9 किलो 390 ग्रॅम सोने आणि 60 किलो चांदी असल्याचे निष्पन्न झाले. ज्याची अंदाजे किंमत 7 कोटी 53 लाख रुपये आहे.
सध्या आयकर विभागाकडून इनव्हाईसची पडताळणी सुरू आहे. तोपर्यंत सोन्या-चांदीचे दागिने पोलीस संरक्षणाखाली सुरक्षितपणे वाहनात ठेवलेले आहेत. कराड उत्तर एफएसटी पथकाने या वाहनाची तळबीड पोलीस ठाण्यातून कराड कोषागारात सुरक्षितपणे नेण्याची जबाबदारी घेतली आहे. योग्य त्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तपासणी प्रक्रिया पूर्ण होताच पुढील माहिती दिली जाईल.

COMMENTS